Uncategorized

उत्कुष्ठ मराठी गझल संग्रह पुरस्कारासाठी प्रस्ताव पाठवा.

Spread the love

 

संस्थेचे जिल्हाध्यक्ष अजय देशपांडे यांचे आवाहन.

वरूड/तूषार अकर्ते

गझल मंथन साहित्य संस्था, कोरपना (चंद्रपूर) व्दारा सर्वोत्कृष्ट मराठी गझल संग्रहाला पुरस्कृत करण्यात येणार आहे. गझलकारांनी पुरस्कारासाठी प्रस्ताव पाठवावे असे आवाहन संस्थेचे अमरावती जिल्हाध्यक्ष अजय देशपांडे यांनी केले आहे. पुरस्काराचे स्वरूप ११ हजार १११ रूपयांचा धनादेश, सन्मान चिन्ह, मानपत्र आणि शाल श्रीफळ असणार आहे. पुरस्कारासाठी १ जानेवारी २०२२ ते दिनांक ३१ डिसेंबर २०२३ या कालावधीत प्रकाशित झालेले गझल संग्रह पाठविता येतील. गझलकाराने संग्रह पाठवताना पुढील नियम व अटींची पूर्तता करावी. प्रकाशित गझल संग्रह हा दिनांक १ जानेवारी २०२२ ते ३१ डिसेंबर २०२३ या कालावधीतील मराठी भाषेतील गझल संग्रह असावा, प्रकाशित गझल संग्रहात केवळ मराठी गझल असाव्यात त्यात काही कविता व काही गझल असे स्वरूप नसावेत, गझल संग्रहाच्या तीन प्रती व गझलकार परिचय तसेच गझल संग्रह स्पर्धेत सहभागी करून घेण्याबाबतचे पत्र दिलेल्या मुदतीत संस्थेस प्राप्त होणे आवश्यक राहील, गझल संग्रहास आय एस बी एन नंबर असणे आवश्यक राहील, गझल संग्रहाचे परीक्षण महाराष्ट्रातील दोन मान्यवर जेष्ठ गझलकारांकडून तसेच द्रोणाचार्य सार्वजनिक वाचनालय कोरपनाच्या भाषा समिती सदस्यांकडून करण्यात येईल.परीक्षण करणाऱ्या मान्यवर जेष्ठ गझलकारांचे नाव संस्थेकडून गुप्त ठेवण्यात आले आहे.
गझल मंथन साहित्य संस्था, कोरपना जिल्हा चंद्रपूर या संस्थेच्या राज्य कार्यकारिणी सभासदांना व सन्मानित मार्गदर्शक समिती सदस्यांना गझल संग्रह पुरस्कार स्पर्धेत सहभागी होता येणार नाही. पुरस्कारासाठी गझल संग्रह पाठविण्याची अंतिम तारीख ७ जानेवारी २०२४ आहे. मराठी गझलकारांनी उपरोक्त कालावधीत प्रकाशित झालेल्या गझल संग्रहाच्या तीन प्रती जयवंत वानखडे (माजी प्राचार्य) सचिव, गझल मंथन साहित्य संस्था, मु. बुरान ले आऊट, वार्ड नंबर १, टीचर कॉलनी, कोरपना तालुका कोरपना जिल्हा चंद्रपूर पिनकोड ४४२९१६ या पत्त्यावर पाठवाव्यात असे आवाहन संस्थेचे अमरावती जिल्हाध्यक्ष अजय देशपांडे यांनी केले आहे.

What’s your Reaction?
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0

मुख्य संपादक : संजय पांडे

Related Articles

Back to top button
Close
Close