आर.जी. देशमुख कृषी विद्यालयाच्या खेळाडूंची निवड विभागीय स्तरावर…..
वाठोडा(प्रतिनिधी)..
वरुड तालुक्यातील ग्रामीण भागातून खेळासाठी प्रसिद्ध असलेल्या वाठोडा येथील आर .जी.देशमुख कृषी विद्यालयाचे चार खेळाडू विविध स्पर्धेमध्ये विभागीय स्तरावर पोहोचले.
जिल्हा क्रीडा अधिकारी अमरावती यांचे द्वारे आयोजित जिल्हास्तरीय शालेय मैदानी स्पर्धेमध्ये वाठोडा येथील आर.जी. देशमुख कृषी विद्यालयाचे विद्यार्थी सतरा वर्षे वयोगटातून राजकुमार पानसे (तिहेरी उडी व लांब उडी) , योगेश्वर विंचुरकर (भालाफेक), प्रफुल्ल धुर्वे (1500 व 3000 मीटर आणि क्रॉस कंट्री ) ,तर चौदा वर्षे वयोगटातून ध्रुव वीरखरे ( लांब उडी), या स्पर्धांमधून विजयी झाले असून त्यांची निवड विभागीय स्तरावर झालेली आहे.
या विद्यार्थ्यांना शारीरिक शिक्षक पी.एम.भुजाडे सर यांचे मार्गदर्शन लाभले असून राहुल देशमुख सर व उमेश कडू सर यांचे सुद्धा सहकार्य लाभले.त्यांच्या विद्यार्थ्यांनी मिळवलेल्या या यशाबद्दल संस्थेचे अध्यक्ष अनिल कुमार देशमुख, सचिव अश्विन कुमार देशमुख, उपाध्यक्ष देवेंद्र बोडखे, प्राचार्य व्ही.एम. खुळे व सर्व शिक्षक वृंदांनी शुभेछ्या दिल्या असून परिसरातील नागरिकांकडून सुद्धा विजयी विद्यार्थ्यांवर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.