सामाजिक

यवतमाळ येथे संघर्ष मोर्चाचे आयोजन

Spread the love

यवतमाळ वार्ता
अरविंद वानखडे

यवतमाळ येथे सरकारी, निम सरकारी, खाजगी क्षेत्रातील संघटित असंघटित कर्मचारी, पेन्शनर्स, व शेतकरी कृती समिती यवतमाळ, च्या वतीने दिनांक 24 सप्टेंबर 2023 सकाळी ठीक दहा वाजता यवतमाळ येथील आझाद मैदानातून भव्य महामोर्चा चे आयोजन करण्यात आलेले आहे
मोर्चाच्या माध्यमातून सर्व स्तरातील विविध मागण्या घेऊन हा मोर्चा शहरातील मुख्य भागातून जिल्हाधिकारी कार्यालय अण्णा निवेदन देण्याकरिता निघणार आहे यामध्ये प्रामुख्याने जुनी पेन्शन योजना लागू करण्यात यावी, सर्व शासकीय विभागातील रिक्त पदांची भरती त्वरित घेण्यात यावी, स्पर्धा परीक्षेची फी राजस्थान सरकार प्रमाणे आकारावी, शेतकऱ्यांना विनाअट पन्नास हजार रुपये आर्थिक मदत देण्यात यावी,, स्वामीनाथन आयोगाच्या शिफारशी तात्काळ प्रभावाने लागू करण्यात याव्या, मागासवर्गीयांचे सरळ सेवा तसेच पदोन्नती मधील रिक्त पदे आरक्षणाच्या धोरणानुसार तात्काळ भरण्यात यावे, पेट्रोल गॅस, डिझेल, तसेच जीवनावश्यक वस्तूंचे किमती कमी करून महागाई नियंत्रणात आणावी, आशा वर्कर, अंगणवाडी सेविका, शालेय पोषण आहारकामगार, उमेद कर्मचारी या सर्व असंघटित क्षेत्रातील कर्मचाऱ्यांना 26 हजार रुपये किमान वेतन देण्यात यावे अशा विविध मागण्याच्या दृष्टीने या मोर्चाचे आयोजन करण्यात आले असल्याचे आयोजक समितीचे निमंत्रक डॉक्टर रवींद्र देशमुख, मुख्य संयोजक नंदकुमार बुटे यांनी एका पत्रकाद्वारे कळविले आहे

What’s your Reaction?
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0

मुख्य संपादक : संजय पांडे

Related Articles

Back to top button
Close
Close