हटके

समुद्र काठावरील घडलेल्या थराराचा तो व्हिडीओ घालत आहे सोशल मीडियावर धुमाकूळ 

Spread the love

                 सोशल मीडियावर व्हायरल होणाऱ्या व्हिडिओत काही व्हिडीओ हे प्राण्यांचे असतात. त्यात कधी वाघ, सिंह यासारख्या हिंस्त्र पशुकडून हरीण, जंगली म्हैस किंवा तत्सम प्राण्यांची करण्यात आलेल्या शिकारीचे  असतात. तर काही व्हिडीओ या हिंस्त्र पशूंच्या तावडीतून सुटलेल्या प्राण्यांचे असतात .

इथे प्राण्यांच्या अनेक थरारक शिकारीचे व्हिडिओज आजवर शेअर झाले आहेत. सध्या देखील अशाच एका शिकारीचा व्हिडिओ सोशल मीडियावर धुमाकूळ घालत आहे मात्र यात कोणते जंगलातील प्राणी नव्हे तर पाण्यातील राक्षसाची शिकार होताना दिसून आले आहे.

मगर हा पाण्यातील सर्वात धोकादायक प्राणी आहे. आपल्या चपळतेने तो समोरच्या व्यक्तीला मृत्यूच्या घाटात पोहचवतो आणि त्याची शिकार करतो. त्याच्या या वृत्तीमुळेच त्याला पाण्यातील राक्षस असे नाव पडले आहे. मगरीच्या शिकारीचे अनेक व्हिडिओज आजवर सोशल मीडियावर शेअर झाले आहेत मात्र आताचा व्हिडिओ काहीसा वेगळा असून यात मगर स्वतःच शिकार झाल्याचे दिसत आहे. शिकारीचा हा अनोखा थरार आता अनेकांना थक्क करत आहे आणि यात नक्की काय घडले ते आपण पुढे जाणून घेणार आहोत.

काय आहे व्हिडिओत?

सध्या सोशल मीडियावर मगरीचा एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. व्हिडीओमध्ये दिसत आहे की, मगर समुद्रकिनारी आराम करत असताना अचानक एक शार्क पाण्यातून बाहेर येते. समुद्रावर जर कोणाचे राज्य असेल तर तो म्हणजे शार्क मासा. यापासून मासेच काय तर माणसंही घाबरून असतात. अशात मगरीच्या यापुढे काय निकाल लागणार… व्हायरल होत असलेल्या व्हिडीओमध्ये समुद्रकिनारी एक मगर उलटी पडून आराम करताना दिसत आहे. यानंतर अचानक मागून एक शार्क येतो आणि काही समजायच्या आतच मगरीचे तोंड आपल्या तोंडात घेत तिला घेऊन थेट पाण्यात निघून जातो. यानंतर पाण्यात काही हालचाल दिसते पण काही क्षणातच ती बंद होते. मगरीला आपल्याला वाचवण्याची संधीही मिळत नाही आणि शार्क आपली शिकार करून मोकळेही होतो.

शिकारीचा हा थरार @AMAZlNGNATURE नावाच्या एक्स अकाऊंटवरून शेअर करण्यात आला आहे. व्हिडिओला आतापर्यंत 14 मिलियनहुन अधिक लोकांनी पाहिले असुंज अनेकांनी कमेंट्स करत यावर आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत. एका युजरने लिहिले आहे, “तो मगर किनाऱ्यावर मरून पडला होता की फक्त चिल करत होता” तर दुसऱ्या युजरने लिहिले आहे, “मी इथे बसून एका महाकाय सागरी स्पायडरने शार्क खाण्याची वाट पाहत आहे”.

टीप – हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून आम्ही वाचकांना काय योग्य आणि काय अयोग्य हे दाखविण्यासाठी लेख देत असतो. कोणत्याही प्रकारे अशा व्हिडिओबाबत आमचे मत योग्य नाही वा आमचा कोणताही दावा नाही.

What’s your Reaction?
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0

मुख्य संपादक : संजय पांडे

Related Articles

Back to top button
Close
Close