वृत्तपत्रांच्या प्रश्नात जातीने लक्ष घालणार , केंद्रीय क्रिडा व युवक कल्याण राज्यमंत्री रक्षा खडसे .
दिल्ली [ प्रतिनिधी ] – सध्याच्या या डिजीटल व सोशल मीडिया च्या जमान्यात कागदावर दररोज च्या ताज्या बातम्यां ची छपाई करून ते वृत्तपत्र देशातील कानाकोपऱ्यात पोहचविण्याचे अवघड कार्य केले जाते , त्यामुळे वृत्तपत्राच्या कोणत्याही प्रश्नात जातीने लक्ष घालणार असल्याचे प्रतिपादन नूतन केंद्रीय क्रिडा व युवक कल्याण राज्यमंत्री ना रक्षा खडसे यांनी केले आहे .
महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाचे प्रदेशाध्यक्ष वसंतराव मुंडे यांनी लिहिलेल्या वृत्तपत्राच्या अर्थकारणावरील पुस्तिका प्रदेश कार्यकारिणी सदस्य बाबा देशमाने यांनी दिल्लीत नुतन क्रीडा व युवक कल्याण राज्यमंत्री रक्षा खडसे यांची मंत्रालयात भेट घेऊन दिली व यावेळी वृत्तपत्रा संदर्भात येणाऱ्या अडचणी यावर चर्चा केली असता , ना . खडसे पुढे म्हणाल्या की , वृत्तपत्र चालविणे महान कार्य तर आहेच , पण तितकेच अवघड ही आहे .
तर माजी केंद्रीय अर्थ राज्यमंत्री डॉ भागवत कराड यांचीही भेट घेऊन पत्रकार संघाचे प्रदेशाध्यक्ष वसंतराव मुंडे यांच्या केंद्र सरकारने वृत्तपत्र खरेदी करणाऱ्यांना उत्पन्न करात वार्षिक पाच हजार रुपये सूट द्यावी , या व इतर मागण्यांबाबत चर्चा केली असता , त्यांनी ही सकारात्मकता दाखविली . यावेळी पत्रकार संघाचे भगीरथ तोडकरी व इतर मान्यवर उपस्थित होते .
प्रदेशाध्यक्ष वसंतराव मुंडे यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाच्या वतीने सर्व पदाधिकाऱ्यांनी राज्यातील सर्वच खासदारांची भेट घेवून वृत्तपत्रांच्या प्रश्नांवर निवेदने देवून चर्चा केली , त्यासंदर्भात केंद्र सरकार चे लक्ष वेधण्याचा ही आग्रह धरला , विशेष म्हणजे सर्वच्या सर्व खासदारांनी सहमती बरोबरच सकारात्मकता दाखविल्याने वृत्तपत्रांचे प्रश्न लवकरच मार्गी लागतील , असा विश्वास निर्माण झाला आहे .