सामाजिक

सासऱ्या समोर मालकाने झापले म्हणून तरुणाने केले असे 

Spread the love

पुणे / नवप्रहार मीडिया

                     वाहनावर ड्रायव्हर असलेला आणि सुपरवायजर म्हणून काम पाहत असलेला तरुण न सांगताच ड्युटीवर आला नसल्याने मालकाने त्याला त्याचा जाब विचारला. आणि त्याला झापले त्यावेळी या तरुणाचे सासरे तेथे उपस्थित होते. या प्रकरणाचा त्याला ईतका राग आला की त्याने  निर्माणाधीन इमारतीच्या सहाव्या मजल्यावरून उडी घेत आत्महत्या केली. याप्रकरणी कोंडवा ठाण्यात कलम 306 अंतर्गत गुन्हा दाखल झाला आहे. 

याप्रकरणी आत्महत्येस प्रवृत्त केल्या प्रकरणी एकावर कोंढवा पोलीस ठाण्यात  गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना गुरुवारी (दि.30) सकाळी सव्वा आठच्या सुमारास कौसर बाग परिसरात घडली.

 

 

 

तोहिद मेहमूद शेख (वय-25 रा. कौसरबाग, कोंढवा) असे आत्महत्या केलेल्या तरुणाचे नाव आहे. तोहित शेख हा अरबाज वली मोहम्मद मेमन यांचेकडे ड्रायव्हर व सुपरवायझर म्हणुन चार वर्षापासून नोकरी करत होता. त्या दोघांमध्ये बुधवारी कामावर न आल्यावरुन वाद झाला होता. अरबाज मेमन हे तोहितच्या सासऱ्यांसमोर त्याला बोलले होते. याचे तोहित याला वाईट वाटले.

यातूनच तोहित याने कौसरबाग (Kausarbag) परिसरात काम चालु असलेल्या एका इमारतीच्या 6 व्या मजल्यावरून उडी मारून (Jumping) आत्महत्या केली. घटनेची माहिती मिळताच कोंढवा पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी प्राथमिक तपास करुन आयपीसी 306 नुसार गुन्हा दाखल केला आहे. दरम्यान, तोहित याने सावकाराच्या
जाचाला कंटाळुन आत्महत्या केल्याची चर्चा होती. मात्र, पोलिसांनी सावकारीचा कोणताही विषय नसल्याचे सांगितले आहे.

What’s your Reaction?
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
1
+1
0

मुख्य संपादक : संजय पांडे

Related Articles

Back to top button
Close
Close