सामाजिक

धनगर मेंढपाळांसाठी उपमुख्यमंत्री यांना निवेदन पवन थोटे मित्र मंडळाचा उपक्रम

Spread the love

यवतमाल / प्रतिनिधि

धनगर समाज मेंढपाळ बांधव आपल्या उदरनिर्वाहासाठी रानावनात,दर्याखोऱ्यात फिरून भटकंती करून करत असतो त्यासाठी त्यांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागते. यासाठी धनगर मेंढपाळ बांधवाना मेंढी चराई साठी कायमस्वरूपी चराई क्षेत्र मिळाले पाहिजे, मेंढीचा व मेंढपाळाचा एक रुपयात विमा काढला पाहिजे,मेंढपाळांना स्वरक्षणासाठी शस्त्र परवाना दिला पाहिजे,ऊसतोड मजुरांच्या मुलांप्रमाणे मेंढपाळाच्या मुलांना शिक्षणाची सोय उपलब्ध करून द्या,धनगरवाड्यावर सोलर लाईटची व्यवस्था करण्यात यावी,मेंढपाळांना राहण्यासाठी टेन्ट उपलब्ध करून द्या,मेंढपाळ बांधवाना व भगिनींना आरोग्य सुविधात्वरित उपलब्ध करून देतायावी म्हणून ऍम्ब्युलन्सची व्यवस्था करून द्यावी आदी मागण्यासाठी महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस राळेगाव दौऱ्यावर आले असता त्यांना पवन थोटे मित्र मंडळातर्फे मेंढपाळांच्या समस्या बाबत अवगत केले,यावेळेस मेंढपाळांचे दैवत असलेले संत बाळूमामा यांची प्रतिमा व घोंगडी भेट देऊन देवेंद्र फडणवीस व आ.डॉ.अशोक उईके यांचे स्वागत करण्यात आले,यावेळेस पवन थोटे, डॉ.भीमराव कोकरे,निखिल शेळके,अरुण गोंडे,विकास निळं, निलेश चामाटे,सुनील येरकर, शिवराम सोन्नर,भीमराज शिंदे,रेणू शिंदे आदी समाज बांधव मोठ्याप्रमाणात उपस्थित होते.यावेळेस फडणवीस साहेबांनी लोकसभा निवडणुकी नंतर तोडगा काढण्याचे आश्वासन दिले.

What’s your Reaction?
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0

मुख्य संपादक : संजय पांडे

Related Articles

Back to top button
Close
Close