सोलर योजनेतील विलंबाबाबत प्रकल्प अधिकाऱ्यांना निवेदन
यवतमाळ (8 जानेवारी):
राज्य शासनाच्या “मागेल त्याला सोलर” या महत्त्वाकांक्षी योजनेत होणाऱ्या विलंबामुळे शेतकऱ्यांमध्ये नाराजी आहे.अर्ज प्रक्रिया पूर्ण केल्यानंतरही आवश्यक सर्वेक्षण व पुढील प्रक्रिया धीम्या गतीने होत असल्याने शेतकऱ्यांना वेळेत सोलर यंत्रणा मिळत नाही.
याच पार्श्वभूमीवर,आज दिनांक 8 जानेवारी रोजी प्रकल्प कार्यकारी अधिकारी,महाऊर्जा,यवतमाळ दिनेश सुरोशे यांना निवेदन देण्यात आले.यावेळी कॉम्रेड सचिन मनवर,प्रा.पंढरी पाठे,बिरसा ब्रिगेडच्या विद्या परचाके,सामाजिक कार्यकर्त्या लीना बोरकर,व शेतकरी प्रकाश कांबळे यांची उपस्थिती होती.शेतकऱ्यांच्या समस्या तातडीने सोडवण्याची मागणी करण्यात आली.
“शेतकऱ्यांच्या समस्या सोडवणे ही आमची प्राथमिकता आहे.’मागेल त्याला सोलर’ योजनेतील अडचणी तातडीने दूर करून शेतकऱ्यांना वेळेत सुविधा मिळावी,यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत.”
– दिनेश सुरोशे,प्रकल्प कार्यकारी अधिकारी,महा ऊर्जा.
“सिंचनासाठी वीज मिळवण्याची आशा ठेवून आम्ही ‘मागेल त्याला सोलर’ योजनेत शेतकरी कर्ज करतात,परंतु विलंबामुळे शेतकामावर मोठा परिणाम होत आहे.शेतकऱ्यांच्या समस्या समजून घेत तातडीने उपाययोजना करण्यात याव्यात.”
— कॉम्रेड,सचिन मनवर.