सामाजिक

जळगाव, पाचोरा येथे पत्रकार संदीप महाजन यांना झालेल्या मारहाणीचा जाहीर निषेध

Spread the love

व्हाॅईस ऑफ मीडिया पत्रकार संघटनेचे एसडीओ मार्फत मुख्यमंत्री यांना निवेदन

राजेश सोनुने पुसद तालुका/ प्रतिनिधी

जळगाव जिल्ह्यातील पाचोरा येथील पत्रकार संदीप महाजन यांना झालेल्या मारहाण करण्यात आली आहे याचा जाहीर निषेध व्हॉइस ऑफ मीडिया पुसद यांच्या वतीने माननीय एकनाथ शिंदे मुख्यमंत्री महाराष्ट्र शासन मुंबई मार्फत उपविभागीय अधिकारी तथा दंडाधिकारी पुसद यांना निवेदन देण्यात आले आहे.
जळगाव जिल्ह्यातील पाचोरा येथील पत्रकार संदीप महाजन यांना आमदार किशोर पाटील यांच्या कार्यकर्त्यांनी मारहाण व शिवीगाळ केली. पत्रकारांवर केलेल्या हल्ल्याचे कदापि समर्थन करता येणार नाही. पत्रकार महाजन यांच्यावर झालेल्या हल्ल्याचा व्हॉइस ऑफ मिडीया च्या वतीने निषेध करण्यात येत आहे . याप्रकरणाची गंभीर दखल घेऊन आमदार व त्याच्या कार्यकर्त्यांवर योग्य ती कार्यवाही करण्यात यावी. तसेच दोषींना कडक शासन करण्यात यावे.
तरी आपणास विनंती कि, पत्रकार संदीप महाजन यांना न्याय मिळवून देण्याबाबत पूर्ण सहकार्य करावे
लोकप्रतिनिधींनी संयम बाळगून आपले कर्तव्य बजावणे अपेक्षित आहे. लोकप्रतिनिधींनी शिवीगाळ किंवा अपमानजनक वक्तव्य पत्रकारांशी करू नये अशी समज आमदार किशोर पाटील यांना आपल्या स्तरावरून देण्यात यावी. असे निवेदन माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना उपविभागीय अधिकारी तथा दंडअधिकारी एकनाथ काळबांडे यांना देण्यात आले आहे निवेदनावर व्हाँईस ऑफ मीडियाचे पुसद तालुका अध्यक्ष समाधान केवटे.कोषाध्यक्ष लक्ष्मण कांबळे .उपाध्यक्ष दिनेश खांङेकर.मंगेश पारटकर.कार्याध्यक्ष मदन बङगुजर सरचिटणीस शंकर माहुरे.सहसरचिटणीस प्रा.अंबादास वानखेङे.कार्यवाहक यशवंत जाधव.संघटक रवि खरात.प्रसिध्दी प्रमुख अरुण बरङे.सदस्य अरविंद कांबळे अविनाश आखरे.पुरुषोत्तम सोङगीर.गुलाब वाहुळे.नंदकिशोर बंग.विजय चव्हाण.रविकांत सिंगनकर.प्रा.एस.एल, राठोङ.कुलदिप सुरोशे. यांच्या स्वाक्षरी आहेत

What’s your Reaction?
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0

मुख्य संपादक : संजय पांडे

Related Articles

Back to top button
Close
Close