श्रीरामपूर येथे माजी वसुंधरा 4.0 या अंतर्गत कार्यक्रम संपन्न

पुसद तालुका प्रतिनिधी:- राजेश सोनुने
पुसद श्रीरामपूर येथे माजी वसुंधरा 4.0 या अंतर्गत कार्यक्रम ग्रामपंचायत पर्यावरण पूरक गणपती बसविणे व पर्यावरण पूरक कार्य करणे याचा प्रतियोगिता घेण्यात आली होती. त्या अनुषंगाने ग्रामपंचायत श्रीरामपूर अंतर्गत ओमकारेश्वर गणेश मंडळ यांनी पर्यावरण पूरक मातीची गणेश मूर्ती बसवली व वृक्षारोपण करणे व त्या झाडाचे संगोपन करणे याकरिता प्रतियोगिता घेतली. तसेच ग्रामपंचायत श्रीरामपूर व ओमकारेश्वर गणेश मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने गणपती विसर्जना करिता अस्थाई पाण्याचे टाके बांधण्यात आले व पर्यावरणाला हानी होणार नाही याची काळजी घेण्यात आली. सदर पाण्याचे टाके पाहण्याकरिता व विसर्जनाचा सोहळा याची डोळा याची द्या अनुभवण्याकरिता पुसदचे कर्तव्यदक्ष उपकार्यकारी अधिकारी काळबांडे साहेब,पंचायत समितीचे गटविकास अधिकारी संजय राठोड साहेब, श्रीरामपूर चे सरपंच आशिष काळबांडे, ग्रामपंचायतचे सदस्य ग्रामपंचायत चे सचिव अनिल भगत व ग्रामपंचायतचे कर्मचारी या ठिकाणी उपस्थित होते ओंकारेश्वर मंडळातील अध्यक्ष व सर्व कार्यकारी मंडळी व गावातील नागरिक या ठिकाणी उपस्थित होते.