सामाजिक

होमिओपॅथीक सायंटिफिक सेमिनार

Spread the love
अमरावती / प्रतिनिधी
अमरावती स्थानिय तखतमल श्रीवल्लभ होमिओपॅथीक वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय – राजापेठ, अमरावती येथे होमिओपॅथीचे जनक डॉ. सॅम्युअल हॅनिमन यांच्या २६८ व्या जयंती निमित्य भव्य सायंटिफिक व्याख्यान व चर्चासत्र चे आयोजन दि. १० एप्रिल २०२३ रोजी सकाळी १०.०० वा. महाविद्यालयीन सभागृहात करण्यात आले आहे. सदर कार्यक्रमाकरीता मुंबई येथील प्रख्यात होमिओपॅथीक तज्ञ व प्रिडेक्टीव होमिओथीचे संचालक डॉ. अंबरीश विजयकर यांचे व्याख्यान आयोजित करण्यात आले आहे व त्यांचे सहकारी पुणे येथील डॉ. रजत मालोकर, अनुयायी प्रिडेक्टीव होमिओपॅथी यांची उपस्थिती राहणार आहे. सदर कार्यक्रमाचे आयोजन प्राचार्य डॉ. सी.पी. अस्वार, इतर शिक्षकवृंद व महाविद्यालयाच्या वतीने करण्यात आले आहे. सदर कार्यक्रमाकरीता मोहिनी होमिओ अॅन्ड चॅरिटेबल सोसायटीचे मा. अध्यक्ष श्री. धिरुभाई कोठारी, मा. सचिव श्री राजेशजी हेडा, मा. उपाध्यक्ष श्री. यु.व्ही. किटुकले व श्री. एस. बी. कलंत्री यांची उपस्थिती राहणार आहे.
What’s your Reaction?
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0

मुख्य संपादक : संजय पांडे

Related Articles

Back to top button
Close
Close