राज्य/देश

वाघाच्या हल्ल्यात गरोदर महिला ठार 

Spread the love

गडचिरोली / नवप्रहार डेस्क .

                      शेतात एकटी काम करत असलेल्या महिलेवर दबा धरून बसलेल्या वाघाने हल्ला करत ठार केले आहे. घटना येथून  १५ किलोमीटर अंतरावर असलेल्या चातगाव बीटमधील जुमगाव मोड रा.कुरखेडा लगतच्या जंगलात घडली.

शारदा महेश मानकर (वय २५) असे आहे. मृत महिलेला तीन वर्षांचा मुलगा आहे. प्राप्त माहितीनुसार शारदा मानकर शेतातील खळ्यावर कामाकरिता गेली असता जंगला लगत शेत असल्याने जंगलात दबा धरून बसलेल्या वाघाने तिच्यावर हल्ला करत तिला ठार केले.

बाजूचा शेतातसुद्धा अनेक महिला काम करीत होत्या. पण ती एकटी असल्याची संधी साधून वाघाने तिला ठार केले. या घटनेची माहिती मिळताच गडचिरोली वनविभागाचे उपवनसंरक्षक मिलिशदत्त शर्मा यांच्या मार्गदर्शनात वनविभागाची चमू घटनास्थळी पोहोचली. पंचनामा करून महिलेचा मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी गडचिरोली जिल्हा सामान्य रुग्णालयात पाठवला.

या घटनेमुळे या परिसरातील नागरिकांमध्ये भितीचे वातावरण तयार झाले आहे. वनविभागाने मृत महिलेच्या परिवाराला तत्काळ आर्थिक मदत करावी, अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे. तसेच या हल्लेखोर वाघाचाही तत्काळ बंदोबस्त करावा, अशीही मागणी ग्रामस्थांनी केली आहे.

What’s your Reaction?
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0

मुख्य संपादक : संजय पांडे

Related Articles

Back to top button
Close
Close