राज्य/देश

प्रयागराज मध्ये घडलेली घटना पूर्वनियोजियत कट ? 

Spread the love
प्रयागराज / विशेष प्रतिनिधी
मौनी अमवस्येच्या दिवशी प्रयागराज येथे घडलेल्या चेंगराचेंगरीची घटना घडली होती. त्यात 30 हुन अधिक लोकांचा मृत्यू झाला होता. आणि शेकडो नागरिक जखमी झाले होते.  दरम्यान, ही घटना आता नियोजित कट असल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. ही चेंगराचेंगरी जाणीवपूर्वक घडवून आणल्याचा संशय तपाय यंत्रणांनी व्यक्त केला आहे.
मीडिया रिपोर्टनुसार, एसटीएफद्वारे या प्रकरणाचा तपास सुरू आहे. विविध अंगांनी हा तपास केला जातो आहे. अपघाताच्या दिवशी संगम परिसरात उपस्थित असलेले १६ हजारांहून अधिक मोबाईल क्रमांक एसटीएफद्वारे तपासण्यात आले आहेत.
सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, यापैकी अनेक मोबाईल क्रमांक बंद असल्याचे पुढे आलं आहे. त्यामुळे तपास यंत्रणांचा संशय बळावला आहे. याशिवाय सीसीटीव्ही फुटेजही तपासले जात आहेत. या व्हिडीओमध्ये ज्यांच्यावर संशय आहे. त्यांचा शोध घेतला जातो आहे. यासाठी फेस रेक्गिनेशन अॅपची मदतही घेतली जाते आहे.
दुसरीकडे या घटनेनंतर विरोधकांकडून सरकारला लक्ष्य केलं जातं आहे. सरकार मृतांची खरी संख्या स्पष्ट करत नसल्याचा आरोपा विरोधकांकडून केला आहे. अशातच तपास यंत्रणांना ही चेंगराचेंगरी नियोजित असल्याचा संशय व्यक्त केला आहे. त्यामुळे विविध चर्चानाही उधाण आलं आहे.
महत्त्वाचे म्हणजे उद्या वसंत पंचमीच्या दिवशी तिसरे शाही स्नान पार पडणार आहे. त्या पार्श्वभूमीवर विशेष काळजी घेतली जाते आहे. त्यासाठी मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. सुरक्षा यंत्रणाही सज्ज आहेत. अनेक मोठे अधिकारीही प्रयागराजमध्ये दाखल झाले आहेत.
What’s your Reaction?
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0

मुख्य संपादक : संजय पांडे

Related Articles

Back to top button
Close
Close