विदेश

उडाण घेताच विमानाचा टायर निखळला 

Spread the love

सन फ्रान्सिस्को / नवप्रहार वृत्तसेवा 

सन फ्रान्सिस्कोहून उड्डाण घेत असताना टायर निखळल्याने जपानला जाणारे युनायटेड एअरलाइन्सचे जेटलाइनर गुरुवारी लॉस एंजेलिसमध्ये उतरले. या विमानात 235 प्रवासी होते तसेच 14 क्रू मेंबर होते.

विमानाच्या डाव्या बाजूच्या मुख्य लँडिंग गियर असेंब्लीवरील सहा टायरपैकी एक टायर निखळला. या घटनेमुळे खळबळ माजली आहे. टायर खाली एका पार्किंग असलेल्या कारवर पडल्याने कारचे मोठे नुकसान झाले आहे.

विमानाने उड्डाण घेताच काही सेकंदात विमानाचा एक टायर निसटल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात शेअर केला जात आहे. या घटनेत कोणीही जखमी झाले नाही. टायर सॅन फ्रान्सिस्को आंतरराष्ट्रीय विमानतळावरील कर्मचाऱ्यांच्या पार्किंगमध्ये पडला. यामुळे कारची मागच्या बाजूचा चक्काचूर झाला आहे. या प्रकरणाची चौकशी सुरु आहे.

एका निवेदनात, एअरलाइनने म्हटले आहे की 2002 मध्ये डिझाईन केलेले हे विमान निखळलेल्या किंवा खराब झालेल्या टायरसह सुरक्षितपणे उतरण्यासाठी डिझाइन केले होते. बाकीच्या प्रवासासाठी प्रवाशांना दुसऱ्या विमानात हलवले जाईल.

 

 

या घटनेची पुढील चौकशी फेडरल एव्हिएशन ॲडमिनिस्ट्रेशनकडून केली जाईल, असे असोसिएटेड प्रेसने म्हटले आहे.

बोईंग 777-200 चे टायर विमानाने उड्डाण केल्यानंतर काही सेकंदात मागील लँडिंग गीअरवरून निखळले तेव्हाचा क्षण व्हिडिओ फुटेजमध्ये कॅप्चर करण्यात आला. क्रूला मलबा साफ करण्याची परवानगी देण्यासाठी धावपट्टी थोडावेळ बंद करण्यात आली होती, SFO चे प्रवक्ते डग याकेल म्हणाले. विमानतळाच्या कामकाजावर कोणताही परिणाम झाला नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले.

What’s your Reaction?
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
1
+1
0
+1
0

मुख्य संपादक : संजय पांडे

Related Articles

Back to top button
Close
Close