पोलिसांच्या अटकेत असलेल्या आरोपीचा पळून जाण्याचा प्रयत्न ; पोलिसांचा गोळीबार

दोन्ही आरोपी जखमी
ओडिशा /. नवप्रहार ब्युरो
एका हिंदू अल्पवयीन मुलीचे अपहरण करून तिच्यावर बलात्कार करणाऱ्या आणि पोलिसात तक्रार दाखल करू नये अशी धमकी देणाऱ्या आरोपींना पोलिसांनी अटक.केली आहे. न्यायालयात नेतांना आरोपीने पोलिसांचीं रिव्हॉल्व्हर हिसकावली आणि त्यातून ३- ४ राऊंड फायर केले .पोलिसांनी प्रत्युत्तरादाखल केलेल्या गोळीबारात आरोपी आसिफ शेख आणिं त्याचा एका साथीदार जखमी झाला आहे. घटना ओडिशातील झारसुगुडा येथे घडली आहे.
झारसुगुडाच्या बेलापहार पोलीस ठाण्याच्या हद्दीत ही घटना घडली. शेख आसिफ नावाच्या मुस्लिम तरुणाने अलिकडेच एका हिंदू अल्पवयीन मुलीचे अपहरण केले होते. आसिफने हिंदू मुलीला धमकावले आणि तिच्यावर बलात्कार केला. या कामात त्यांना अभिषेक बारिक नावाच्या मुलाने मदत केली.
पीडितेने ही गोष्ट तिच्या कुटुंबियांना सांगितली. यानंतर, जेव्हा पीडितेच्या कुटुंबाने पोलिसांकडे कारवाई करणार असल्याचे सांगितले तेव्हा शेख आसिफच्या कुटुंबाने पीडितेच्या कुटुंबाला धमकी दिली. त्यांनी तिला हे कोणालाही सांगू नये आणि पोलिसात एफआयआर दाखल करू नये म्हणून दबाव आणला. धमकी दिल्यानंतरही पीडितेच्या कुटुंबियांनी पोलिसांशी संपर्क साधला आणि एफआयआर दाखल केली. यानंतर झारसुगुडा पोलिसांनी दोघांनाही अटक केली. दि. १२ एप्रिल रोजी न्यायालयात हजर करण्यासाठी पोलिस त्याला व्हॅनमधून घेऊन जात होते. दरम्यान, शेख आसिफने एका पोलिसाकडून रिव्हॉल्व्हर हिसकावून घेतली.
यानंतर त्याने पळून जाण्याचा प्रयत्न केला आणि रिव्हॉल्व्हरमधून ३-४ गोळ्या झाडल्या. पोलिसांनी त्याला आणि त्याच्या साथीदाराला पकडण्यासाठी प्रत्युत्तरादाखल गोळीबार केला, ज्यामध्ये दोघेही जखमी झाले. यानंतर पोलिसांनी दोघांनाही अटक केली. दोघांवरही उपचार सुरू आहेत.
या प्रकरणात, ओडिशाच्या उत्तर रेंजचे आयजी हिमांशू कुमार लाल यांनी एका वृत्तसंस्थेने दिलेल्या माहितीनुसार, “आसिफ शेख आणि त्याच्या कुटुंबाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. चकमकीत आसिफ शेख गंभीर जखमी झाला आहे, त्याच्यावर उपचार सुरू आहेत. आम्ही या प्रकरणातील दोन्ही आरोपींवर कठोर कारवाई करू.”, असेही सांगण्यात आले आहे.