क्राइम

मैत्रिणीने धोका देत  अल्पवयीन तरुणीला कुंटणखान्यात विकले 

Spread the love

मुलीच्या तक्रारीवरून पाच महिलांविरोधात गुन्हा दाखल 

पुणे  / नवप्रहार ब्युरो 

        बांगलादेश येथील एक तरुणी आपल्या मैत्रिणीला बेकायदेशीर रित्या भारतात घेऊन आली. त्यानंतर तिने त्या मैत्रिणीने. तिला कुंटनखाना चालविणाऱ्या महिलेला पाच लाखात विकले. कुंटणखाना चालविणाऱ्या महिलेने तिला पोलिसात देण्याचा धाक दाखवत तिच्याकडून देहविक्री करून घेतली.त्या पीडितेने स्वतःची कशीबशी सुटका करून घेत पोलिसात पोहचून तक्रार दाखल केली. पोलिसांनी पाच महिलांवर विविध कलमांतर्गत गुन्हा दाखल केला आहे. त्यातील एका महिलेला फारसानखाना पोलिसांनी अटक केली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार पीडित मुलगी १६ वर्षे दोन महिन्यांची आहे. तिला बांग्लादेशातून मैत्रिणीने नोकरी आणि फिरण्याचे आमिष दाखवत पुण्यात आणले. यासाठी तिने बांग्लादेशातून नदीमार्गे बेकायदा भारताची सीमा ओलांडली. पुण्यात आल्यावर त्या भोसरीमध्ये सात ते आठ दिवस राहिल्या. यानंतर तिच्या मैत्रिणीने तिला बुधवार पेठेत आणले. तिथे तिला एका महिलेला पाच लाखांत विकले. यानंतर महिलेने तिला तुळशीबाग आणि बुधवार पेठेतील कोठ्यात ठेवले. तिला पोलिसांत देण्याची धमकी देत वेश्‍याव्यवसाय करण्यात भाग पाडले. पीडितेला अत्याचार सहन होत नव्हते. मात्र, तिला खोलीतून बाहेर पडू दिले जात नव्हते.

पाच महिने अत्याचार सहन केल्यावर तिने एकदा सुटकेचा प्रयत्न केला, मात्र तो असफल झाला. मात्र, ती सात एप्रिलला कशीबशी खोलीतून बाहेर पडली. तिने बस, रिक्षा पकडत हडपसर गाठले. तेथे हडपसर पोलीस ठाण्याची माहिती मिळताच तेथे धाव घेत तक्रार दाखल केली. हडपसर पोलिसांनी गुन्हा दाखल करीत तो फरासखाना पोलिसांकडे वर्ग केला. याप्रकरणी फरासखाना पोलिसांनी पाच महिलांवर गुन्हा दाखल करीत एका महिलेला अटक केली आहे. या प्रकरणी तपास वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रशांत भस्मे करीत आहेत.

What’s your Reaction?
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
1
+1
0
+1
0

मुख्य संपादक : संजय पांडे

Related Articles

Back to top button
Close
Close