पोलिस स्टेशन घाटंजीला मिळाला मुद्देमाल निर्गतीत जिल्हात प्रथम क्रमांक
उत्तम कामगिरी केल्याबद्दल जिल्हा पोलिस अधीक्षकांनी केले कौतुक व सन्मानित.
घाटंजी तालुका प्रतिनिधी – सचिन कर्णेवार
यवतमाळ जिल्हा पोलीस प्रशासनाच्या वतीने राबविण्यात येणाऱ्या प्रत्येक उपक्रमात सहभाग घेऊन प्रशासकीय कारभारात सुधारणा करण्यासाठी व जिल्हा पोलिस अधीक्षक डॉ पवन बन्सोड यांच्या संकल्पनेतून सुरु असलेल्या जिल्ह्यातील प्रत्येक पोलिस ठाण्यात असणाऱ्या तक्रारी तथा घडलेल्या गुन्ह्याचा तपास पुर्ण करुन जनतेसमोर पारदर्शकता आणण्यासाठी मागील महिन्यात विविध हेडखाली राबविण्यात आलेल्या उपक्रमाचा अहवाल घेऊन उत्कृष्ट कार्य करणाऱ्या पोलिस ठाण्यातील अधिकारी यांना सन्मानित करून प्रोत्साहन दिले गेले.विविध प्रकारच्या गुन्ह्यात जप्त करण्यात आलेल्या मुद्देमाल ज्यांचा आहे त्यांना परत देण्यासाठी तसेच पोलीस जनता यामध्ये सलोखा निर्माण व्हावा व पोलिस हे जनतेचे रक्षक ही जान समाजात रूजावी या उद्देशाने प्रत्येक महिन्याच्या क्राईम मिटिंग घेण्यात आल्या. मागील महिन्यात जिल्ह्यातील पोलिस ठाण्यांच्या कारभाराचा अहवाल घेऊन उत्कृष्ट कार्य करणाऱ्या पोलिस ठाण्यातील अधिकारी व कर्मचारी यांना सन्मानित करून कामाची गती वाढविण्यासाठी प्रोत्साहित केले गेले यात घाटंजी पोलीसांनी उपविभागीय पोलिस अधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलिस निरीक्षक सुषमा बावीस्कर यांनी जानेवारी 2023 मध्ये दोषसिद्धी मध्ये प्रथम क्रमांक पटकावला तसेच मार्च महिन्यात गुन्हे निर्गती मोहिमेत उत्तम कामगिरी व एप्रिल 2023 मध्ये गुन्हे निर्गती मध्ये द्वितीय क्रमांक मिळविला मे मध्ये मुद्देमाल निर्गती मोहिमेमध्ये प्रथम क्रमांक,जानेवारी ते एप्रिल मध्ये CCTNS मध्ये द्वितीय क्रमांक मिळाला. मे महिन्यात क्राईम मिटिंगमध्ये जिल्ह्यातील घाटंजी पोलीसांनी मुद्देमाल निर्गतीत चांगली कामगिरी करून जिल्हा पोलिस दलात मान उंचावली त्यामुळे जिल्हा पोलिस अधीक्षक डॉ पवन बन्सोड व अप्पर पोलीस अधीक्षक पियुष जगताप यांच्या हस्ते घाटंजी पोलिस स्टेशनच्या सहायक पोलिस निरीक्षक मा.सुषमा बावीस्कर मॅडम व उध्दव टेकाम यांना पुष्पगुच्छ व प्रमाणपत्र देऊन यथोच्च सन्मानित करण्यात आले.या सफल कार्यात उपविभागीय पोलिस अधिकारी प्रदीप पाटील साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलिस निरीक्षक सुषमा बावीस्कर,पोलिस उपनिरीक्षक विलास सिडाम,उपनिरीक्षक शशीकांत नागरगोजे,जमादार आणि कर्मचारी यांनी मोलाची कामगिरी बजावली.