क्राइम

खुनाची ती पद्धत पाहून पोलिसही चक्रावले

Spread the love

दौंड / विशेष प्रतिनिधी 

         नागरिकांनी दिलेल्या माहिती नंतर पोलिसांनी भीमा नदीच्या पात्रातून जेव्हा तरंगणारे गाठोडे काढले आणि ते सोडले तेव्हा त्यांना गाठोड्यात तरुणाचा मृतदेह आढळून आला. तरुणाचा खून करून मृतदेह गाठोड्यात गुंडाळल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे. पण ज्यापद्धतीने खून करून गाठोडे बांधण्यात आले आहे. ते पाहून पोलिस देखील चक्रावले आहेत.

शनिवारी भीमा नदीवरील रेल्वे पुलाजवळ नागरिकांना एक मोठे गाठोडं तरंगताना दिसलं. सुरुवातीला तो कचरा असावा असं वाटलं, पण संशय बळावला आणि पोलिसांनी याबद्दल माहिती देण्यात आली, पोलिसांनी तपासणी केली असता, त्यात एका तरुणाचा मृतदेह आढळून आला. मारेकऱ्यांनी खुनानंतर कमालीची खबरदारी घेतली होती. त्यांनी मृतदेह आधी प्लास्टिकच्या ताडपत्रीत आणि नंतर पोत्यात घट्ट गुंडाळला होता. हे गाठोडं सुटू नये म्हणून त्यावर एका साडीने मजबूत गाठी मारल्या होत्या. हे पाहून हा खून गुन्हेगाराने थंड डोक्याने केल्याचे स्पष्ट होत आहे.

मयत तरुणाची ओळख पटवणं पोलिसांसमोर मोठं आव्हान आहे. मात्र, त्याच्या उजव्या हातावर ‘त्रिशूळ’ गोंदलेले आढळले आहे. तपासाची हीच पहिली पायरी ठरण्याची शक्यता आहे. मारेकऱ्यांनी हा मृतदेह रेल्वे पुलावरून नदीत फेकला असावा, जेणेकरून तो वाहून जाईल किंवा कुजल्यामुळे ओळख पटणार नाही, असा प्राथमिक अंदाज आहे. दरम्यान, याप्रकरणी अधिक तपास पोलिस करत आहेत.

What’s your Reaction?
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0

मुख्य संपादक : संजय पांडे

Tags

Related Articles

Back to top button
Close
Close