विदेश

आईने मुलाला पाळीव स्वाना सोबत पाहिले तसे करतांना अडवताच मुलाने केले असे 

Spread the love

वॉशिंग्टन / नवप्रहार न्यूज नेटवर्क 

                   कुत्रा, मांजर, पोपट  या सारखे पाळीव प्राणी पाळण्याचा अनेकांना छंद असतो. काही लोक यांच्या सोबत काही वेळ घालवून स्वतःला ताजेतवाने ठेवतात.कुत्रा , मांजर यांची गणना प्रामाणिक प्राण्यात होते. कुत्रा हा घराची राखण करण्यासोबत कुटुंबातील सदस्यांवर आपत्ती आल्यास त्यांचे रक्षण करण्यास सदैव तत्पर असल्याने जगातील अनेक लोक कुत्रा पाळतात. कुत्र्याने स्वतःचा जीव धोक्यात टाकून कुटुंबियांचे प्राण वाचविल्याचे अनेक किस्से व्हायरल होत असतात. पण अमेरिकेच्या इंडियाना मध्ये अशी घटना घडली की वाचून तुम्हालाही धक्का बसेल आणि जगात काही लोक किती विकृत विचारसरणीचे असतात याचा प्रत्यय येईल. 

असंच एक धक्कादायक प्रकरण समोर आलं आहे. एका तरुण मुलाने पाळीव श्वानासोबतच शारीरिक संबंध ठेवले. मुलाचं कुत्र्यासोबत हे कृत्य पाहून त्याची आई हादरली. तिने त्याला अडवताच त्याने तिच्यासोबतही धक्कादायक कृत्य केलं. अमेरिकेच्या इंडियानातील ही घटना आहे. ब्लेक राफेट असं या विकृत तरुणाचं नाव आहे. तो 20 वर्षांचा आहे त्याच्या घरी एक कुत्री पाळली होती. तिच्यासोबत त्याने शारीरिक संबंध ठेवायाल सुरुवात केली.

एक दिवस त्याच्या आईने त्याला पाहिलं आणि तिला धक्काच बसला. ती मोठ्याने ओरडली आणि कुत्र्यापासून आपल्या मुलाला दूर करण्याचा प्रयत्न करू लागली. त्याला असं करण्यापासून रोखू लागली. पण ब्लेकने तिचं ऐकलंच नाही. अखेर कसंबसं तिने कुत्र्याला मुलापासून वेगळं केलं. – उलट ब्लेक इतका वडा झाला की त्याने स्वतःच्या आईलाही सोडलं नाही. आईने कुत्र्यासोबत शारीरिक संबंध ठेवण्यापासून अडवताच त्याने तिचं डोकं ठेचण्याचा प्रयत्न केला.

तिला जाळण्याचीही धमकी दिली. ब्लेकचं कृत्य पाहून त्याची आई इतकी घाबरली की तिने पोलिसात धाव घेतली. आपल्या मुलाविरोधात आईनेच पोलीस ठाण्यात तक्रार दिली. पोलिसांनी ब्लेकला अटक केली. कोर्टाने त्याला तुरुंगात टाकलं आहे. काही दिवसांपूर्वी अमेरिकेतील मिसिसिपीमध्ये अशीच एक घटना समोर आली होती. एका 19 वर्षीय तरुणीने कुत्र्यासोबत संबंध ठेवले. तिने स्वत: याचा व्हिडिओ बनवून सोशल मीडियावर व्हायरल केला. नंतर तिला अटक करण्यात आली.

What’s your Reaction?
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0

मुख्य संपादक : संजय पांडे

Related Articles

Back to top button
Close
Close