अपघात

पिक अप वाहन दरीत कोसळले, चार मजुरांचा मृत्यू 

Spread the love
अमरावती / विशेष प्रतिनिधि 
             मजुरांना घेऊन जात असलेल्या पीक अप वाहनाचा अपघात होऊन 50 फूट दरीत कोसळल्याने चार मजुरांचा मृत्यू झाला आहे. तर सात ते आठ मजूर जखमी झाले आहेत.स्थानिकांच्या मदतीने घटनास्थळी तातडीने मदत कार्य राबवण्यात आले.
मजूर धारणी तालुक्यातील बेलतलाई वरून कंजूली या आपल्या गावी जात होते. पिकअप वाहनात 20 पेक्षा अधिक मजूर असल्याची माहिती समोर आली आहे.  मी उपजिल्हा रुग्णालयात पोहोचलो असून 10 जखमी रुग्णांवर उपचार सुरू आहेत.  त्यातील 4 रुग्ण हे पुढील उपचारासाठी तातडीने दुसऱ्या रुग्णालयात पाठवण्यात आले.  जिल्हा माहिती कार्यालय आणि जिल्हाधिकारी कार्यालयातून ही माहिती देण्यात आली.
What’s your Reaction?
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0

मुख्य संपादक : संजय पांडे

Tags

Related Articles

Back to top button
Close
Close