हटके

त्याने बायकोला अन्य पुरुषासोबत नको त्या अवस्थेत पाहिले पण …….

Spread the love

                   सध्या विवाहबाह्य संबंध ही काही नवीन बाब राहिली नाही. अश्या संबंधासाठी काही वेळा पतीचा डोह असतो तर काही वेळा पत्नीचा पण पतीला जर पत्नीच्या अवैध संबंधाबद्दल माहिती पडली आणि फक्त माहितीच झाली असे नाही तर त्याने तिला पर पुरुषासोबत नको त्या अवस्थेत पाहिले तरी देखील तो काही न बोलता किंवा भांडण तंटा न करता हे सगळे मुकाट्याने सहन करत असेल तर त्याला तुम्ही काय म्हणाल? एक तर तुम्ही नवऱ्याला भित्रा किंवा अन्य काही म्हणाल पण या नवऱ्याने ज्या विचाराने याकडे डोळेझाक पणा केला ते वाचुन तुम्ही एकतर त्याचे कौतुक कराल किंवा त्याला काहीतरी सल्ला द्याल.

त्याच्या मते त्याची पत्नी त्याला दगा देत असल्याचं त्याला दोन वर्षाआधीच समजलं होतं. पण तरीही त्याने याचा विरोध केला नाही . या घटनेवर गप्प बसला. तो म्हणाला की, त्याचं त्याच्या पत्नीवर खूप प्रेम आहे. वैवाहिक जीवन चांगलं सुरू आहे. तीन मुलेही आहेत. याकारणाने व्यक्ती यावर काही बोलला नाही. त्याला भीती होती की, त्याचा घटस्फोट तर होणार नाही ना.

या व्यक्तीने रेडीटवर त्याची कहाणी सांगितली. त्याने लिहिलं की, काही वर्षाआधी मी लंच ब्रेकमध्ये बाइकने घरी जेवणासाठी आलो होतो. जेव्हा मी घरात गेलो तर गॅरेजचा दरवाजा उघडा होता आणि तिथे माझ्या पत्नीच्या कारसोबत आणखी एक कार उभी होती. मी गाडी पार्क करून गॅरेजकडे गेलो. त्यानंतर बेडरूमकडे गेलो. काही अजब आवाज त्याला ऐकू आले आणि जाऊन पाहिलं तर पत्न एका व्यक्तीसोबत होती. मी दोघांना रंगेहाथ पकडलं होतं.

यानंतर तो म्हणाला की, आत घडलेला प्रकार बघून तो घराबाहेर आला. 15 मिनिटांनंतर पत्नी तिच्या एका मित्रासोबत घरातून बाहेर आली. मिरर यूकेच्या रिपोर्टनुसार, व्यक्ती म्हणाला की, तो नेहमीच आपल्या ऑफिसमधून दुपारच्या वेळी घराबाहेर जातो. त्याला ती गाडी गॅरेजमध्ये महिन्यातून तीन ते चार वेळ उभी दिसते. पण तो काहीच बोलत नाही. त्याच्या पत्नीला हे माहीत नाही की, तिच्या पतीला तिच्याबाबत सगळं काही माहीत आहे.

त्याने पोस्टमध्ये पुढे लिहिलं की, मला शंभर टक्के माहीत आहे की, काय सुरू आहे. पण हे स्वीकारलं आहे. मला माहीत आहे की, ती व्यक्ती कोण आहे. तोही विवाहित आहे. मी माझ्या पत्नीसोबत कधीच याबाबत बोलणार नाही. कारण त्याचं वैवाहिक जीवन चांगलं सुरू आहे. जर काही बोलला तर संसार मोडू शकतो. सोशल मीडियावर लोक या व्यक्तीचं खूप कौतुक करत आहेत. तर काही लोक त्याला पत्नीला सगळं काही सांगण्याचा सल्ला देत आहेत.

What’s your Reaction?
+1
0
+1
0
+1
0
+1
1
+1
0
+1
0
+1
3

मुख्य संपादक : संजय पांडे

Related Articles

Back to top button
Close
Close