मंगरूळ येथे उद्योग – रोजगार निर्मिती पूर्व मार्गदर्शन मेळावा उत्साहात संपन्न
मूर्तिजापूर (प्रतिनिधी ) तालुक्यातील ग्राम मंगरूळ येथे एससी , एसटी , ओबीसी प्रवर्गातील सुशिक्षित व बेरोजगार युवक- युवतींसाठी राज्य व केंद्र सरकारच्या योजनांची माहिती व मार्गदर्शन मेळावा व सामाजिक कार्यकर्ते सत्कार सोहळा घेण्यात आला.
या कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून सामाजिक कार्यकर्ते तथा तिक्ष्णगत वेलफेयर सोसायटी कोर कमिटी सदस्य गजानन तायडे होते तर उद्घाटक म्हणून सामाजिक कार्यकर्ते विठ्ठल पांढरे होते . तसेच प्रमुख पाहुणे अण्णाभाऊ साठे क्रांती सेनेचे जिल्हाध्यक्ष प्रभाकर बोरकर , तिक्ष्णगत चे व्यवस्थापक अमित खांडेकर महिला संपर्क अधिकारी मनीषा तायडे कलाविष्कार चे संस्थापक तथा तिक्ष्णगत मुर्तिजापूर तालुका समन्वयक मिलिंद इंगळे , तिक्ष्णगत कार्यालय मुर्तिजापूर चे कार्यक्रम अधिकारी – नेहरु युवा मंडळाचे तालुक्काध्य अनिल डाहेलकर , जेष्ठ कार्यकर्ते माणिकराव बोरकर , सरपंच सुभाष वाकोडे उपसरपंच अभय पाटील , तंटामुक्ती अध्यक्ष सागर कांबे , पोलीस पाटील दिनेश वाकोडे अक्षय सिरसाठ विषाल शिंदे व समस्त गावकरी मंडळी उपस्थित होती त्या कार्यक्रमाचे संचालन पूजा वैद्य यांनी केले तर आभार मिलिंद इंगळे यांनी मानले या कार्यक्रमाचे आयोजन नरेंद्र मोरे व तीक्ष्णगत मल्टीर्पजवेल पर सोसायटी यांनी केले .
तिक्ष्णगत मल्टीपर्पज वेलफेयर सोसायटी चे संचालक तथा अध्यक्ष सुगत वाघमारे यांच्या मार्गदर्शनात उद्योग आणि रोजगार संदर्भात शासनाच्या योजनांची अंमलबजावणी करीता ग्रामिण युवक युवतींना अपेक्षित आणि सदज्ञान असे मार्गदर्शन करुन त्यांना उद्योग आणि रोजगार निर्मिती करीता सक्षम करण्या उद्देशाने सदर मार्गदर्शन कार्यक्रम गावोगावी आयोजित करण्याचा मानस गजानन तायडे यांनी आपल्या अध्यक्षीय भाषनातुन बोलून दाखविला. या वेळी उपस्थित मान्यवरांनी ही आपापल्या पध्दतीने मार्गदर्शन केले .