हटके

स्कुटी उडून 15  फूट उंच विजेच्या तारांवर लटकली

Spread the love

             जगात अश्या काही घटना घडत असतात ज्यावर सहजासहजी विश्वास बसत नाही . पण या घटनेतील पुरावे बघितल्यावर मात्र त्यावर विश्वास ठेवावाच लागतो. अशीच घटना जम्मू च्या ग्रेटर कैलास भगत घडली आहे. येथे बिपरजॉय वादळामुळे एक स्कुटी उडून 15 फूट उंच विद्युत तारांवर जाऊन लटकली. या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.

जम्मू काश्मीर भागात सुद्धा तुफान वादळी वाऱ्यांमुळे काही भागात नुकसान झाल्याचे आढळून आले. जम्मूच्या ग्रेटर कैलास भागात या वादळी वाऱ्यांमुळे एक विचित्र दुर्घटना झाल्याचे दिसून आले. प्राप्त माहितीनुसार या ठिकाणी एक स्कुटी चक्क उडून विजेच्या तारांमध्ये अडकून पडली होती. स्थानिकांनी सांगितल्याप्रमाणे हवेमुळे स्कुटी १५ फूट उंच उडून गेली होती.

व्हायरल व्हिडिओमध्ये आपण पाहू शकता की काळ्या रंगाची एक दुचाकी कर्मशियल बिल्डिंगच्या बाजूला असलेल्या विजेच्या तारांवर अडकून पडली आहे. अनेकजण व्हिडीओ व फोटो काढत आहेत तर याठिकाणी पोलीस सुद्धा उपस्थित आहेत. प्राप्त माहितीनुसार ही स्कुटी सना नामक एका तरुणीची असल्याचे समजतेय जी जवळच्या प्लॅनेट ब्युटी सॅलोनमध्ये काम करते. स्थानिक न्यूज एजन्सीतर्फे हा व्हिडीओ शेअर करण्यात आल्याचे समजतेय.

ट्विटरवर हा व्हिडीओ शेअर करताना अनेकांनी जम्मू मध्ये वादळी वाऱ्यांनी झालेल्या अन्य प्रकारच्या नुकसानाविषयी सुद्धा लिहिले आहे. मागील दोन आठवड्यात देशभरातील विविध भागांमध्ये बिपरजॉय वादळाचा तडाखा पाहायला मिळाला होता. यामुळे महाराष्ट्रात मग गुजरातमध्ये वादळी वाऱ्यांसह पाऊस कोसळला होता. IMD च्या माहितीनुसार या चक्रीवादळामुळे काही ठिकाणी भू-स्खलन होण्याची सुद्धा शक्यता वर्तवण्यात आली आहे. हे वादळ आतापर्यंत सर्वाधिक काळ सक्रिय राहिलेले वादळ आहे.

What’s your Reaction?
+1
0
+1
0
+1
1
+1
1
+1
0
+1
0
+1
0

मुख्य संपादक : संजय पांडे

Related Articles

Back to top button
Close
Close