हटके

पतीने पत्नीला बनवले सुर्पणखा , पत्नीचे कापलेले नाक डब्यात ठेवून पोहचला ठाण्यात 

Spread the love

            रामायण महाकाव्यात लक्ष्मण रावणाची बहीण सुर्पणखा हिचे नाक कापतो.त्याचा परिणाम आपण पाहिलाच आहे. अशीच एक घटना उत्तरप्रदेश मध्ये घडली आहे. येथे एका नवऱ्याने बायकोला प्रियकरासोबत पकडले. त्यामुळे त्याचा राग इतका अनावर झाला की त्याने तिच्या नाकाचा चावा घेतला. यानंतर त्याने ते नाक डब्यात भरले आणि पोलिस स्टेशन मध्ये पोहचला. .

या घटनेत 25 वर्षीय पत्नी गंभीर जखमी झाली आहे. रक्तबंबाळ अवस्थेत तिला रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. दरम्यान पतीला ताब्यात घेण्यात आल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, महिलेचे एका तरुणाशी विवाहबाह्य संबंध होते. हा तरुण त्यांच्याच गावात वास्तव्यास होता. मागील 10 महिन्यांपासून त्यांच्यात प्रेमसंबंध सुरु होते. महिला आपल्या प्रियकराला भेटण्यासाठी गेली असताना ही घटना घडली. पत्नीचे विवाहबाह्य संबंध असल्याचा पतीला संशय होता. भांडणानंतर पत्नी घऱातून बाहेर पडली असता, पतीने तिचा पाठलाग सुरु केला होता. यादरम्यान पत्नी तिच्या प्रियकराच्या घरी गेल्याचं त्याला आढळलं. त्याने पत्नीला रंगेहाथ पकडल्यानंतर दोघांमध्ये जोरदार वाद झाला. त्याने पत्नीची समजूत काढून घरी नेण्याचा प्रयत्न केला. पण जेव्हा पत्नीने घरी येण्यास नकार दिला तेव्हा पती राम खिलवान याने नाकाचा चावा घेत तिला गंभीर जखमी केलं असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. हे सर्व घडलं तेव्हा प्रियकर तिथेच उभा होता.

भांडणाचा आणि नंतर महिलेचा रडतानाचा आवाज ऐकून स्थानिक आणि कुटुंबीयांनी घटनास्थळी गर्दी केली होती. यादरम्यान महिलेला रक्तबंबाळ अवस्थेत पाहिल्यानंतर अनेकांच्या भुवया उंचावल्या.

धक्कादायक म्हणजे पतीने कापलेलं नाक एका डय्बात ठेवलं आणि पोलीस स्टेशन गाठत माहिती दिली. पोलिसांनी त्याला ताब्यात घेतलं आहे. पोलिसांनी महिलेला हरदोई मेडिकल कॉलेजमध्ये उपचारासाठी दाखल केलं आहे. महिलेची गंभीर स्थिती पाहता डॉक्टरांनी तिला पुढील उपचारासाठी लखनऊच्या रुग्णालयात रेफर केलं आहे. दरम्यान पोलिसांनी पतीला ताब्यात घेतलं असून त्याची चौकशी केली जात आहे. सर्व बाजूंनी या प्रकरणाचा तपास केला जाईल असं पोलिसांनी सांगितलं आहे.

पत्नी पूजा देवीने सांगितलं आहे की, त्यांच्या लग्नाला 10 वर्षं झाली आहेत आणि त्यांना दोन मुलं आहेत. पती मागील अनेक काळापासून शोषण करत असल्याचा तिचा आरोप आहे. त्याला कंटाळूनच आपण प्रियकराच्या घरी गेल्याचा तिचा दावा आहे.

अतिरिक्त पोलीस महासंचालक नरेंद्र कुमार यांनी पतीला ताब्यात घेतलं असून, त्याची चौकशी केली जात असल्याचं सांगितलं आहे. “कायदेशीर कारवाई केली जात आहे. या प्रकरणाचा सर्व बाजूंनी तपास केला जाईल,” असं ते म्हणाले आहेत.

What’s your Reaction?
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0

मुख्य संपादक : संजय पांडे

Related Articles

Back to top button
Close
Close