क्राइम

प्रियकराच्या मदतीने पतीची हत्या

Spread the love
 लुटमार झाल्याचा बनाव पण पोलिसांच्या नजरेतून काहीच सुटले नाही 

भोपाळ / विशेष प्रतिनिधी 

                    बालविवाह झालेल्या प्रियंकाला सज्ञान झाल्यावर तिला पती देवकृष्ण सोबत राहण्यास सांगितले. दरम्यान तिचे सुत कमलेश सोबत जुळले. त्यामुळे तिने देवकृष्ण सोबत जाण्यास तयार नव्हती. ती कशीबशी तयार झाली. पण तिच्या मनात वेगळेच काही सुरू होते. तिने देवकृष्ण ला रस्त्यातून हटवण्याचा प्लान आखला. कमलेश ने मित्र सुरुंद्रला हत्येची
 प्रियकरासाठी पतीला संपवणाऱ्या पत्नीला अटक करण्यात आली आहे. पतीला संपवून पत्नीनं लूटमार झाल्याचा बनाव रचला. पतीच्या मृत्यूनंतर पत्नी धाय मोकलून रडली. पण पोलीस तपासातून तिचा पदार्फाश झाला. पतीच्या मृत्यूनंतर ओक्साबोक्शी रडणारी पत्नीच या सगळ्यामागची मास्टरमाईंड निघाली. ही घटना मध्य प्रदेशच्या धार जिल्ह्यात घडली आहे.

धार जिल्ह्यातील गोंदी खेडा चारण गावात झालेल्या हत्येचा तपास पोलिसांनी पूर्ण केला आहे. देवकृष्ण पुरोहितची हत्या त्याची पत्नी प्रियांका आणि तिचा प्रियकर कमलेशनं केल्याची माहिती तपासातून समोर आली. यानंतर पोलिसांनी दोघांना अटक केली. पती देवकृष्णपासून स्वतःची सुटका करून घेण्यासाठी प्रियांकानं कमलेशच्या साथीनं हत्येची योजना आखली आणि तडीस नेली.
कमलेशनं त्याचा साथीदार सुरेंद्रला देवकृष्णच्या हत्येसाठी १ लाख रूपयांची सुपारी दिली होती.
फॉरेन्सिक पथकाच्या हाती लागलेले पुरावे आणि कसून करण्यात आलेली चौकशी यानंतर प्रियांकानं गुन्ह्याची कबुली दिली. आता पोलिसांकडून सुरेंद्रचा शोध सुरू आहे. तो अद्याप फरार आहे.
पोलीस अधीक्षक मयंक अवस्थी यांनी दिलेल्या माहितीनुसार, प्रियांकाचा विवाह वयाच्या १५ व्या वर्षीच झाला होता. बाल विवाह असल्यानं देवकृष्ण आणि प्रियांका वेगवेगळे राहायचे. दोघे आपापल्या कुटुंबासोबत राहत होते. २१ वर्षे पूर्ण झाल्यानंतर प्रियांकाला पतीसोबत राहण्यास सांगण्यात आलं. पण ती यासाठी तयार नव्हती. याच सुमारास तिचं कमलेश सोबत सूत जुळलं. हेच नातं पुढे देवकृष्णच्या जीवावर बेतलं.
मध्यरात्रीच्या सुमारास सुरेंद्रनं देवकृष्ण आणि प्रियांकाच्या घरात प्रवेश केला. त्यावेळी ते दोघे झोपलेले होते. सुरेंद्रनं देवकृष्णच्या डोक्यावर धारदार हत्यारानं वार केले. त्यात त्याचा जीव गेला. देवकृष्णची हत्या घरात लूटमारीच्या उद्देशानं झाली हे दाखवण्यासाठी आरोपींनी सगळा देखावा उभा केला.
सुरेंद्रनं प्रियांकाला दुसऱ्या खोलीत बांधून ठेवलं. काही वेळानंतर सुरेंद्र निघून गेला आणि प्रियांकानं आरडाओरडा सुरू केला. तिचा आवाज ऐकून शेजारीपाजारी जमले. त्यांच्या समोर प्रियांका धाय मोकलून रडली. चोरीच्या उद्देशानं घरात घुसलेल्या व्यक्तीनं पतीवर हल्ला केला, त्याला संपवलं, असं म्हणत प्रियांका अगदी हमसून हमसून रडली.
घटनेची माहिती मिळताच पोलीस, सायबर टीम पोहोचली. त्यांच्या सोबत श्वान पथकदेखील होतं. प्राथमिक तपासातच पोलिसांनी हे प्रकरण संशयास्पद वाटलं. त्यामुळे त्यांनी प्रियांकाची कसून चौकशी केली. त्यातून संपूर्ण प्रकरणाचा उलगडा झाला. पोलिसांनी अवघ्या ३६ तासांत प्रियांका आणि कमलेशला अटक केली.
What’s your Reaction?
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0

मुख्य संपादक : संजय पांडे

Tags

Related Articles

Back to top button
Close
Close