अल्पवयीन मुलीचे अपहरण करून दुसऱ्या राज्यात नेऊन तिचे दोन महिने लैंगिक शोषण

बलिया (युपी )/ नवप्रहार मीडिया
याला पुरुषी मानसिकता म्हणावं की आरोपींचा कायद्याची कुठलीही भीती राहली नाही ? असे म्हणावे असा प्रश्न सध्या जनसामान्यांच्या मनात घोंगावतोय. योगी सरकार कडून आरोपींच्या घरावर बुलडोजर चालविल्या जात असले तरी युपी मधील गुन्हेगारांवर याचा कुठलाही परिणाम होतांना दिसत नाही,. क्राईम कमी होण्यापेक्षा उलट ते वाढताना दिसत आहे.
नुकतेच उज्जैन मधील एका मतिमंद मुलीवर ऑटो चालकाने अल्पवयीन मुलीवर बलात्कार केल्याची लज्जास्पद बाब उघडकीस आली होती. शासनाने आरोपीला पकडल्यावर त्याचे घर पाडून टाकले. पण यानंतर देखील तरुणी ,अल्पवयीन मुली आणि महिलांवरील अत्याचार कमी होताना दिसत नाहीये. नुकताच एका १७ वर्षीय अल्पवयीन मुलीचं गावातून अपहरण करून तिच्यावर दोन महिने वारंवार बलात्कार केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.
नराधम आरोपीनं पीडितेचं अपहरण केल्यानंतर तिला परराज्यात घेऊन गेला. येथे जवळपास दोन महिने आरोपीनं तिच्यावर लैंगिक अत्याचार केला. याप्रकरणी पोलिसांनी २० वर्षीय नराधमाला अटक केली आहे. या घटनेचा पुढील तपास केला जात आहे.
‘इंडिया टुडे’नं दिलेल्या वृत्तानुसार, संबंधित घटना उत्तर प्रदेशच्या बलिया जिल्ह्यातील एका गावातील आहे. येथील एका १७ वर्षीय मुलीचं १४ ऑगस्ट रोजी रात्री गावातून अपहरण करण्यात आलं होतं. अपहरणकर्त्याने तिला कर्नाटकात नेलं, येथे जवळपास दोन महिने तिच्यावर वारंवार बलात्कार करण्यात आला. याप्रकरणी पोलिसांनी अखेर पीडित मुलीची सुटका केली, अशी माहिती एका पोलीस अधिकाऱ्याने बुधवारी दिली. तसेच आरोपीला मंगळवारी अटक करून तुरुंगात पाठवण्यात आलं असल्याचंही त्यांनी सांगितलं.
१४ ऑगस्ट रोजी रात्री गावातील एका २० वर्षीय व्यक्तीने पीडित मुलीचं अपहरण केल्यानंतर पीडितेच्या आईने दिलेल्या तक्रारीवरून पोलिसांनी अपहरणासह विविध कलामांतर्गत गुन्हा दाखल केला होता. यानंतर मंगळवारी (१० ऑक्टोबर) पोलिसांनी बिल्थरा रोडवेज येथून मुलीची सुटका केली आणि आरोपीला अटक केली.
यावेळी पोलिसांना दिलेल्या जबाबात पीडित मुलीनं सांगितलं की, आरोपीनं तिचं गावातून अपहरण केलं आणि तिला कर्नाटकात नेलं. येथे जवळपास दोन महिने तिच्यावर वारंवार बलात्कार केला. पीडित मुलीच्या जबाबानुसार पोलिसांनी संबंधित प्रकरणात भारतीय दंड संहितेच्या कलम ३७६ (बलात्कार) आणि बाल लैंगिक अत्याचार प्रतिबंधक (पोक्सो) कायद्यातील तरतुदी जोडल्या, याबाबतची माहिती पोलीस अधिकारी राजीव मिश्रा यांनी दिली.