हटके

दोन वाघांच्या झुंजीचा व्हिडीओ सोशल मीडियावर घालतोय धुमाकूळ

Spread the love

नवी दिल्ली / नवप्रहार मीडिया 

                  जंगलात शाकाहारी आणि हिंस्त्र असे दोन्ही पेरणी राहतात. यातील वाघ सिंह या प्राण्यांचे अधिवासाचे क्षेत्र निश्चित असते. प्रत्येकाला आपल्या क्षेत्रात दुसऱ्याचा हस्तक्षेप सहन होत नाही. मनुष्यप्रामाणे वर्चस्वासाठी त्यांच्यातही द्वंद्व होत असते. दोन वाघात लढाई होत असलेला एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच धुमाकुळ घालत आहे.

अवाढव्य, बलवान, सर्वच प्रकारचे प्राणी अनेकदा एकमेकांशीच लढाई करतात. अशा घटनांचे बऱ्याचदा व्हिडीओही समोर येत असतात. असाच एक जंगलातील एक व्हिडीओ समोर आलाय, ज्यामघ्ये दोन वाघ एकमेकांवर तुटून पडलेत. दोन वाघांच्या लढाईचा व्हिडीओ समोर आला असून हा व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होतोय. दोघांमध्ये चुरशीची लढाईल पहायला मिळतेय. जंगलातील हा व्हिडीओ काही पर्यटकांनी शूट केला असून सध्या सर्वांचं लक्ष वेधून घेत आहे.

समोर आलेल्या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता, एक वाघ जंगलात फिरत आहे. त्याचवेळी दुसरा वाघ तिथे येतो. दोन वाघ आमनेसामने येताच त्यांच्यात घनघोर लढाई सुरू होते. सुरुवातीला दोघेही एकदम जोशमध्ये भांडण करत असतात मात्र थोड्याच वेळात दोघेही थंड होतात आणि भांडण थांबवतात.

@crazyclipsonly नावाच्या X अकाऊंटवर हा व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे. 20 सेकंदांचा हा भांडणाचा व्हिडीओ इंटरनेटवर तुफान व्हायरल होतोय. व्हिडीओवर भरपूर कमेंट येत आहेत. अशा प्रकारच्या प्राण्यांच्या भांडणाचे व्हिडीओ कायमच समोर येत असतात. वेगवेगळ्या प्राण्यांमध्ये चुरशीची लढाई रंगत असते. अशा भांडणांमध्ये, हल्ल्यांमध्ये काहींनी प्राण्यांना आपला जीवही गमवावा लागतो.

What’s your Reaction?
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0

मुख्य संपादक : संजय पांडे

Related Articles

Back to top button
Close
Close