देवधरीत नवरात्री उत्सवाच्या निमित्ताने मोफत रुग्ण तपासणी शिबीराचे आयोजन.
४५७ रुग्णांनी घेतला शिबीराचा लाभ
घाटंजी तालुका प्रतिनिधी -सचिन कर्णेवार
नवरात्री उत्सवाच्या निमित्ताने सगळीकडे उत्साह संचारला आहे. गरबा,जगराता यात मंडळ व युवापिढी तल्लीन असतांना काही मंडळ मात्र समाज उपयोगी कार्यक्रमात रस घेत असून त्या माध्यमातून समाजसेवेचा वसा जप्त आहे. दी. २२.१०२३ रोज रविवार ला असाच समाज उपयोगी व रुग्णांना मोफत वैद्यकीय तपासणी शिबीर कार्यक्रम पारवा जवळील देवधरी येथिल अष्टभुजा सार्वजनिक दूर्गाउत्सव मंडळा व्दारा आयोजित करण्यात आला. या कार्यक्रमाला कर्तव्यदक्ष पारवा ठाणेदार प्रविण लिंगाडे,कृषी उत्पन्न बाजार समिती घाटंजी चे उपसभापती सचिन देशमुख पारवेकर यांनी भेट देऊन या मंडळ चालविलेल्या रुग्णसेवा कार्याबद्दल पदाधिकारी यांचे स्वागत पण केले.या आरोग्य तपासणी शिबीराचा ४५७ नागरिकांनी लाभ घेतला असून या कार्यक्रमाला गावकरीही हे मंडळ पदाधिकारी यांनी मोलाचे परिश्रम घेतले.