सामाजिक वनीकरण विभागाच्या वतीने अर्जापुर येथे वृक्ष लागवड व दिंडी
बिलोली (प्रतिनिधी)
तालुक्यातील अर्जापुर येथे वनविभागाच्या वतीने “एक पेड मां के नाम” कार्यक्रम घेत वृक्ष दिंडी काढून नागरीकांची जनजागृती करण्यात आली आहे.
बिलोली तालुक्यातील अर्जापुर येथे सामाजिक वनीकरण विभागाच्या वतीने वृक्षारोपण रोपन कार्यक्रम जिल्हा परिषद शाळेत आयोजित करण्यात आला होता. यावेळी सामाजिक वनीकरण विभागाचे सहायक वनसंरक्षक संदीप चव्हाण, वनपरिक्षेत्र अधिकारी श्रीकांत जाधव सौ. शितल डोंगरे यांच्या मार्गदर्शनाखाली “एक पेड मां के नाम”वन महोत्सव अंतर्गत अर्जापूर येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत वृक्ष लागवड करुन वृक्षदिंडी काढून पानसरे स्मारक मध्ये वृक्षारोपण करून वन महोत्सव साजरा करण्यात आला आहे. गावातील नागरिकांना व शाळेतील विद्यार्थ्यांना वृक्ष लागवडी बाबत माहिती सांगण्यात आली आहे. या पावसाळ्यात एक वृक्ष आपल्या आईच्या नावावर लावण्यात यावे “एक पेड मां के नाम” बाबत जनजागृती करण्यात आली आहे. कार्यक्रमाला सरपंच सिद्धार्थ पतंगे, उपसरपंच बाबा पटेल प्रा. डॉ. मोहसीन खान, मुख्याध्यापक सलीम व सर्व शिक्षक वृंद वनपाल मसियोद्दीन काजी, वनपाल फरीद शेख वनरक्षक सय्यद फयाज, वनरक्षक मुसळे वनरक्षक गायकवाड, वनरक्षक मजरे गावातील नागरिक उपस्थित होते.