शिवसेनेच्या या नेत्याने रेल्वे खाली येऊन केली आत्महत्या
मुंबई / नवप्रहार मीडिया
विक्रोळी प्रक साईट भागात कट्टर शिवसैनिक म्हणून ओळखले जाणारे आणि ठाकरे गटाशी एकनिष्ठ असलेल्या सुधीर सयाजी मोरे यांनी रेल्वे खाली हेत आत्महत्या केल्याने खळबळ माजली आहे. ब्लॅकमेलिंग च्या प्रकरणातून ही घटना घडल्याचे बोलल्या जात आहे.
सुधीर मोरे यांचा दांडगा जनसंपर्क आणि कार्यकर्त्यांची मजबूत फळी होती. याच भांडवलाच्या जोरावर ते मागील अनेक वर्षांपासून विक्रोळी पार्कसाईटमध्ये आपले वर्चस्व राखून होते. त्यामुळे गेल्या अनेक वर्षांपासून या भागात शिवसेनेचा ) नगरसेवक निवडून येत होता. उमेदवार कोणी असो सुधीर मोरे यांच्या वरदहस्तामुळे ही जागा शिवसेना जिंकत होती. या भागात त्यांचा दबदबा होता. त्यांच्या आत्महत्येचे वृत्त परिसरात समजताच मोठी खळबळ उडाली आहे.
सुधीर मोरे यांच्या आत्महत्येची बातमी समोर आल्यानंतर अनेक चर्चांना उधाण आलं आहे. या विभागात सुधीर मोरे ) यांची ओळख एक खंबीर नेता म्हणून होती. अरे ला कारे करण्याची धमक त्यांच्यात होती. त्यामुळे त्यांनी आत्महत्येसारखे टोकाचे पाऊल का उचलले, असा प्रश्न अनेकांना पडला आहे. सुधीर मोरे यांच्या निकटवर्तीयांच्या मते त्यांना गेल्या काही दिवसांपासून ब्लॅकमेल केले जात होते. याच दबावातून त्यांनी आत्महत्या केली असावी.
मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, गुरुवारी रात्री सुधीर मोरे यांना एक फोन आला.
यानंतर त्यांनी मी वैयक्तिक कामासाठी जात असल्याचे सांगितले. ते अंगरक्षकांना सोबत न घेताच घरातून बाहेर पडले. त्यांनी स्वत:च्या गाडीने प्रवास न करता रिक्षाने घाटकोपरला गेले.
यानंतर त्यांनी ट्रॅकवरुन चालत घाटकोपर ते विद्याविहार या दोन स्थानकांमध्ये असलेल्या पुलाखाली गेले. तिथे साडेअकराच्या दरम्यान ते रुळावर झोपले. त्यावेळी एक लोकल ट्रेन कल्याणवरुन सीएसएमटीच्या दिशेने जात होती.
मोटरमनने कोणीतरी ट्रॅकवर झोपल्याचे पाहून वेग कमी करण्याचा प्रयत्न केला. परंतु, ट्रेन वेगात असल्याने सुधीर मोरे यांच्या अंगावरुन गेली आणि त्यांच्या शरीराचे तुकडे होऊन त्यांचा जागीच मृत्यू झाला.