हटके

महिला नागा साधू बद्दल ऐकलंय का कधी ? कश्या बनतात त्या नागा साधू ?

Spread the love

        पुढल्या वर्षी ( 2025) प्रयागराज येथे कुंभमेळा भरणार आहे. यात महिला साधू देखील सहभागी होणार आहेत. महिला नागा साधू बद्दल नेहमीच लोकांच्या मनात उत्सुकता राहिली आहे . महिला नागा साधू कश्या बनतात ?  कसे असते त्यांचे राहणीमान ? असे विविध प्रश्न जनतेच्या मनात उत्पन्न होत असतात. चला तर जाणून घेऊ या महिला साधूंच्या जीवनशैली बद्दल .

                 पुरुष नागा साधुंना तुम्ही अनेकदा पाहिले असेल. पण महिला नागा साधू बद्दल ऐकले असेलच असे नाही. कारण महिला नागा साधू सहसा पुरुष नागा साधू प्रमाणे जनतेत वावरत नाही. साधारणतः महिला नागा साधू ला कुंभमेळा दरम्यान बघितल्या जाते. महिला नागा साधूंच्या जीवनशैली बद्दल जाणून घेण्यासाठी महिला कश्या बनतात नागा साधू आणि त्यांना कुठल्या समस्यांचा सामना करावा लागतो. हे जाणून घेऊ या !

काय आहे प्रक्रिया …….

             महिला नागा साधू बनण्यासाठी अनेक संकटांचा सामना करावा लागतो. त्यांना अनेक परीक्षेतून जावे लागते. महिलांना यासाठी 6- 12 वर्ष ब्रह्मचर्य चे पालन करावे लागते. त्यानंतरच त्यांना नागा साधू बनण्याची परवानगी मिळते. जी एक पदवी आहे. वैष्णव, शैव और उदासीन आखाड़े नागा साधुंचे असतात.

महिला नागा साधूची अशी असते वेशभूषा – 

साधारणतः पुरुष नागा साधू नग्न राहतात.  पुरुष जनतेत कपडे विनाच जाऊ शकतात. पण महिला नागा साधूंना तशी परवानगी नाही. त्यांना केशरी रंगाचे कपडे परिधान करावे लागतात. मुख्य म्हणजे त्यांच्या कपड्यांना कुठेच शिलाई नसते. त्यांच्या डोक्यावर कुमकुम आणि शरीरावर भस्म असते.

ही आहे महिला साधू बनण्याची प्रक्रिया –

ब्रह्मचर्य व्रत पूर्ण झाल्यावर आखाड्याचे महामंडलेश्वर स्त्रियांना दीक्षा देतात. नागा साधू बनणाऱ्या महिलांना आपले सगळे सबंध तोडून स्वतःला देवाप्रती समर्पित व्हावे लागते. भगवे का कपडे घालण्यासोबत त्यांना डोक्यावरचे केस देखील काढावे लागतात. हिंदू शाश्त्रा नुसार व्यक्ती मेल्यावर कुटुंबीय त्याचे पिंडदान करतात. पण  महिला नागा साधूंना जिवंतपणीच स्वतःचे पिंडदान करावे लागते.

या ठिकाणी असतो महिला नागा साधूंचा वास –               महिला नागा साधू पहाड, जंगल आणि गुफेत राहून आयुष्य जगतात. येथे राहून त्या तपश्चर्या करतात. पूअन् कुंभमेळ्यात मात्र  त्या आंघोळीसाठी येतात. यावेळी प्रयागराज( युपी) येथे कुंभमेळा भरणार आहे. त्यामुळे याठिकाणी महिला नागा साधूंचे दर्शन होऊ शकतात.

What’s your Reaction?
+1
0
+1
1
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0

मुख्य संपादक : संजय पांडे

Related Articles

Back to top button
Close
Close