हटके

महिला कंडक्टर आणि महिला प्रवाश्यात हाणामारी

Spread the love

लातूर / नवप्रहार मिडिया नेटवर्क 

लोकल, एसटी किंवा अन्य ठिकानी महिलांमधील भांडण काही आता नवीन गोष्ट राहिली नाही.पण एखाद्या शासकीय पदावर कार्यरत महिला आणि एका सामान्य महिलेत वाद हा कमीच पाहायला मिळतो. त्यातल्या त्यात त्यांच्यात हाणामारी हा विषय पाहायला काय एकायलाही मिळत नाही. पण लातूर मध्ये महिला कंडक्टर आणि महिला प्रवाश्यात फ्रिस्टाईल झाल्याची घटना लातूर मध्ये घडली आहे.

या घटनेचा व्हिडीओ एका प्रवाश्याने रेकॉर्ड केला आहे. कानी तो सोशल मीडियावर व्हायरल केला आहे.सोशल मीडियावर या हाणामारीचा व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होताना दिसत आहे.

व्हायरल होणाऱ्या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता एक महिला आणि बसची कंडक्टर यांच्यात हाणामारी होताना दिसत आहे. किरकोळ वादातून ही हाणामारी झाली आहे. या व्हिडीओमध्ये महिलांची हाणमारीला थांबविण्यासाठी अखेर इतर प्रवाशांना पुढाकार घ्यावा लागला.

ही हाणामारी नेमकी कोणत्या कारणामुळे झाली हे मात्र अद्याप समजू शकलेले नाही. महिलांमधील ही हाणामारी बस स्थानकावर उपस्थित एका प्रवाशाने काढला आणि तो सोशल मीडियावर पोस्ट केला.

What’s your Reaction?
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
2

मुख्य संपादक : संजय पांडे

Related Articles

Back to top button
Close
Close