जगात अशक्य काही नाही; जिद्द आणि चिकाटी ठेवा – आमदार राजेंद्र पाटणी.
कारंजा:- दिनांक २५ मे २०२३ रोजी कारंजा – मानोरा विधानसभा मतदार संघाचे आमदार मा. श्री. राजेंद्र पाटणी यांनी कारंजा येथील औद्योगीक प्रशिक्षण संस्था येथे छत्रपती शाहु महाराज युवा शक्ती करिअर शिबिरात उपास्थित विद्यार्थी विद्यार्थीनींना मार्गदर्शन करतांना सांगितले की, जगात अशक्य काही नाही; जिद्द आणि चिकाटी ठेवा . शिक्षण, व्यवसाय,प्रशिक्षण, नौकरी करीता कोठेही जाण्याची तयारी ठेवा.आपल्यात क्षमता असुन आपली क्षमता ओळखा आणि माझं करिअर मलाच घडवायचे आहे या बाबत आत्मविश्वास बाळगा.
शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था,कारंजा येथे आयोजीत छत्रपती शाहु महाराज युवा शक्ती करिअर शिबिरात विद्यार्थी – विद्यार्थिनींनी सहभागी होऊन मार्गदर्शनाचा लाभ घ्यावा असे आवाहन कारंजा मानोरा मतदार संघाचे आमदार मा. श्री. राजेंद्र पाटणी यांनी केले होते. उप विभागीय अधिकारी ललीतकुमार वऱ्हाडे, तहसिलदार झाल्टे, उद्योजक तथा IMC अध्यक्ष,शा औ . प्र.संस्था कारंजा लाड मनोज अग्रवाल ,कार्यक्रमातील प्रमुख वक्ते- मुधोळकर सर ( व्यक्तिगत विकास) ,प्रांजली वसाखे (पालक विद्यार्थी मार्गदर्शक) ,विष्णु गावंडे (प्रेरणादायी वक्ते) आदीसह प्राचार्य भालेराव , मानोरा प्राचार्य कहाळे, सह आयुक्त जिल्हा कौ. रो उद्योजकता मार्गर्शन केंद्र वाशिम , भाजपा तालुका अध्यक्ष डॉ राजीव काळे, भाजपा शहर अध्यक्ष ललित चांडक, भाजपा जैन प्रकोष्ठ चे ज्ञायक पाटणी, भाजपा उपाध्यक्ष राजीव भेंडे, युवामोर्चा अध्यक्ष अमोल गढवाले, इत्यादीसह अन्य होते.
कार्यक्रमास मार्गदर्शन मा. आमदार राजेंद्र पाटणी साहेब, उपविभागीय अधिकारी वऱ्हाडे यांनी केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्राचार्य भालेराव यांनी केले तर कार्यक्रमाचे संचलन संजय लोहसने यांनी केले.व्यासपीठावरील सर्व मान्यवरांचा सत्कार करण्यात आला. शिबिराचे पहिल्या सत्रातील उपरोक्त कार्यक्रम येथे पार पडला. कार्यक्रमास औद्योगीक प्रशिक्षण संस्थेचे कर्मचारी उपास्थित होते. असे संजय भेंडे भाजपा तालुका प्रसिध्दी प्रमुख तथा आमदार राजेंद्र पाटणी यांचे स्वीय सहाय्यक यांनी कळविले.