हटके

नवजात बाळाचा  डॉक्टरांच्या हातातून निसटल्याने मृत्यू  ? 

Spread the love
नाशिक / नवप्रहार मिडिया
             प्रसूती दरम्यान नवजात बाळ डॉक्टरांच्या हातातून निसटून जमिनीवर डोक्यावर पडल्याने त्याचा मृत्यू झाल्याचा आरोप महिलेच्या नातेवाईकांनी केला आहे. तर रुग्णालय प्रशासनाने हा आरोप फेटाळून लावत बाळाचा आधीच मृत्यू झाला होता असे म्हटले आहे. महिलेच्या कुटुंबीयांनी पोलिसात धाव घेतली आहे. तर सत्य काय ते शवविच्छेदन अहवाल आल्या नंतरच कळणार आहे.
घटना नाशिकच्या वसंतराव पवार मेडिकल कॉलेजमध्ये  घडली आहे. डॉक्टरच्या हातातून नवजात बाळ खाली पडल्याचा आरोप बाळाच्या नातेवाईकांनी केला आहे. तर बाळ आधीच दगावल्याचा दावा रुग्णालयानं केला आहे.
 पण या प्रकारामुळं मोठी खळबळ उडाली आहे. या प्रकारानंतर बाळाच्या नातेवाईकांनी रुग्णालयात गोंधळ घातला असून आडगाव पोलीस ठाण्यात कुटुंबियांकडून तक्रार दाखल केली आहे.
दोन दिवसांपूर्वी हा प्रकार घडला असून संबंधित महिलेची प्रसुती झाल्यानंतर प्रशिक्षणादरम्यान नवजात बाळ डॉक्टरच्या हातातून निसटलं आणि खाली डोक्यावर पडलं, यामध्ये त्याचा मृत्यू झाला असा आरोप बाळाच्या नातेवाईकांनी केला आहे. यानंतर संबंधित कुटुंबियांनी रुग्णालयात गोंधळ घातला. पण रुग्णालय प्रशासनानं हा दावा फेटाळून लावला असून बाळाचा आधीच मृत्यू झाला होता, असा दावा केला आहे.
यावेळी रुग्णालय प्रशासनाकडं कुटुंबियांनी बाळाच्या फाईलची मागणी केली, पण रुग्णालयानं यासाठी टाळाटाळ केल्यानं, कुटुंबियांनी थेट पोलिसांत धाव घेत तक्रार दाखल केली. पोलिसांकडूनही या घटनेचा तपास सुरु करण्यात आला आहे. पण बाळाचा मृत्यू नेमका कशामुळं झाला हे शवविच्छेदनाचा अहवाल आल्यानंतरच स्पष्ट होऊ शकेल.
What’s your Reaction?
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0

मुख्य संपादक : संजय पांडे

Related Articles

Back to top button
Close
Close