आमदार रणधीरभाऊ सावरकर यांनी साधला बूथ प्रमुखांशी ,शेतकऱ्याची संवाद
लाडली बहीण योजना, मतदार नाव नोंदणी सह विविध विषयांवर केली” चर्चा
अकोला
मातृ शक्ती यांचा सन्मान व समाजामध्ये त्यांचे महत्त्व लक्षात एसटी प्रवासात 50 टक्के सूट व मुख्यमंत्री लाडकी बहीण ही योजना सुरू केली आणि महाराष्ट्राच्या एक कोटी पेक्षा जास्त महिलांनी यामध्ये सहभाग घेतला आहे या योजनेचा लाभ सर्वात पोहोचण्यासाठी व केंद्र आणि राज्य सरकारच्या योजना जनतेपर्यंत पोहोचवण्यासाठी ऑनलाईन आणि ऑफलाईन याचा उपयोग करून कार्यकर्त्यांनी कार्य करावे यावेळी अतिवृष्टी सुरू असून शेतकऱ्यांच्या शेतावर जाऊन पाहणी करून बूथ प्रमुखांशी अकोला पूर्वचे आमदार रणधीरभाऊ सावरकर यांनी रविवारी थेट सवांद साधला
. चोहट्टा बाजार येथील बाजार समिती मध्ये आयोजित एका छोटेखानी बैठकीत आमदार सावरकर यांनी चोहट्टा बा जी प सर्कल मधील उपस्थित बूथ प्रमुखांशी संवाद साधत लाडली बहीण योजना संदर्भात सविस्तर चर्चा करून गोरगरीब माता भगिनींचे अर्ज स्वतः लक्षपूर्वक भरून देऊन त्यांना सहकार्य करण्याच्या सूचना केल्या.
तसेच सद्या मतदार नाव नोंदनी अभीयान सुरु असून यामध्ये नवीन नावे नोंदणी करून त्यांना मतदानाचा अधिकार मिळावा यासाठी सुद्धा जातीने लक्ष देऊन जास्तीत जास्त नोंदनी करावी अशाही सूचना आमदार सावरकर यांनी यावेळी दिल्या.
यावेळी मतदार संघातील विविध विकास कामांचा आढावाही त्यांनी घेतला.