नगर परिषद जिजामाता मुलीच्या शाळेची दैनिय अवस्था
आवार भिंत पडल्याने डुकरे व चोरट्यांचा त्रास
चांदूर रेल्वे तालुका प्रतिनिधी
स्थानीक चांदूर रेल्वे येथील नप जिजामाता प्राथमिक शाळेत 147मुलींची पट संख्या असून या ठिकाणी पहीली ते पाचवी वर्गा पर्यंतचे शिक्षण नगर परिषद क्षेत्रातील मुली शिक्षण घेतात परंतु मागील दीड वर्षापासून या शाळेची संरक्षण भींत ही पडली असल्याने शाळेतील मुलींना डुकराचा त्रास व शालेय पोषण आहारला चोरट्याची भीती आहे तरी नगर परिषद प्रशासन निद्रा अवस्थेत आहे.
नगर परिषद अंतर्गत मुलांची व मुलींच्या शाळा शहरात असून शहरातील गोरगरीब जनतेचे मुले मुली या शाळेत शिक्षण घेतात अश्या शहराती मध्य भागात व आठवडी बाजाराला लागुन असलेली नप जिजामाता प्राथमिक कन्या शाळा असून या शाळेत 147 इतकी मुलींची पटसंख्या आहे पहिली ते पाचवी पर्यंत वर्ग या ठिकाणी चालते परंतु या शाळेच्या आवारात भींत ही मागील बर्याच वर्षांपासून पडून असल्याने या शाळेतील मुलींना मोकाट जणांवर व डुकराचा त्रास आहे जेवण करत असतांना हे यांच्या डब्यावर डल्ला मारण्यासाठी येतात तर भुकटे चोर या शाळेत असलेले मुलीचे पोषण आहार दोन ते तीन वेळा या शाळेचे कुलूप फोडून चोरी गेले तर पिण्याच्या पाण्याचे नळ,पाईप लाईन ही चोरीला गेल्याची तक्रार येथील मुख्याधिपिका दीपावली उंदरे यांनी स्थानिक पोलिस ठाण्यात दिल्या तरी नगर परिषद प्रशासनाने कुठलीही दखल घेतली नाही आजही या शाळेची अवस्था गंभीर आहे मुलींना मोकाट डुकराचा व जणावराचा त्रास व पोषण आहार ला चोरट्यांची भिती असल्याचे बोलल्या जाते.केन्द्र व महाराष्ट्र सरकार महिलांना घेऊन संवेदनशील असून मुलींना प्रत्येक क्षेत्रात प्राधान्य दिले जाते तर नगर परिषद या लहान कामासाठी कुठ्याल्या मोठ्या घटनेची वाट पाहत आहे हे समजण्या पलीकडे आहे.या शाळेचे चित्र पाहत असे वाटते की नगर परिषद प्रशासन व स्थानिक लोकप्रतिनिधींना समस्या सोडविण्यासाठी असर्मथ आहे.खरीची यांना जनतेची सेवा व लोकहित साधायचे असते तर लहान मुलींच्या शाळेची अशी अवस्था बिकट झाली नसती असे म्हणे का बागवे होणार नाही तरी लवकरात लवकर संरक्षण भींत बांधण्याचे या शाळेतील पाल्याच्या पालकाची विनंती प्रशासनाला आहे.
# शाळेच्या संरक्षण भिंतीचे बांधकामसाठी वरिष्ठांची पत्र व्यवहार केला -: मुख्याधिपिका दिपावली उंदरे
नगर परिषद जिजामाता मुलीची शाळाची संरक्षण भिंत बांधकामाकरीता जागेची लांबी रुंदी व नकाशाच्या प्रत नगर परिषद व शिक्षण विभागाच्या वरिष्ठ कार्यालयात माहिती व पत्र व्यवहार केले असून लवकरच संरक्षण भिंतीचे काम पुर्ण होईल असे वरिष्ठांनी सांगितले आहे.