राजकिय

मुंबईकरांचा महायुतीला कौल ,सत्तास्थापनेसाठी आवश्यक मॅजिक फिगर गाठले

Spread the love

मुंबईकरांचा महायुतीला कौल ,सत्तास्थापनेसाठी आवश्यक मॅजिक फिगर गाठले

मुंबई / विशेष प्रतिनिधी

संपूर्ण जगाचे लक्ष लागून असलेल्या मुंबई महानगर पालिकेच्या निवडणुकीचे निकाल जाहीर झाले आहेत. यात भाजप सगळ्यात मोठा पक्ष म्हणून नावारूपास आला आहे. मुंबईकरांनी महायुतीच्या बाजूने कौल देत त्यांना सत्तास्थापनेसाठी आवश्यक असलेले मॅजिक फिगर गाठून दिले आहे. त्यामुळे आता मुंबईत भाजप चा महापौर बसेल हे वेगळे सांगायची आवश्यकता उरलेली नाही.

मुंबई महानगरपालिकेच्या 227 जागांसाठी झालेल्या चुरशीच्या लढतीत भारतीय जनता पक्षाने (BJP) मुसंडी मारत मुंबईतील सर्वात मोठा पक्ष होण्याचा मान मिळवला आहे.

भाजपने एकूण 89 जागांवर विजय मिळवत मुंबई महापालिकेच्या राजकारणात आपले वर्चस्व सिद्ध केले आहे.

गेल्या अडीच दशकांपासून मुंबईवर असलेल्या ठाकरेंच्या यांच्या सत्तेला सुरुंग लावत भाजपने सर्वाधिक जागा जिंकत नंबर वन पक्ष होण्याचा बहुमान मिळवला आहे. विकासाच्या जोरावर भाजपने मुंबईच्या कानाकोपऱ्यात कमळ फुलवले आहे.

मुंबईत कोणत्या पक्षाने किती जागा जिंकल्या?

  • भाजप – 89
  • शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे – 65
  • शिवसेना – 29
  • काँग्रेस – 24
  • एमआयएम – 8
  • मनसे – 6
  • राष्ट्रवादी काँग्रेस – 3
  • समाजवादी पार्टी – 2
  • राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार – 1

एकूण – 227

मतदानाची टक्केवारी आणि कल

या निवडणुकीत एकूण 54,64,412 मतदारांनी आपला हक्क बजावला. एकूण मतदानापैकी 47.72% मतदारांनी विजयी उमेदवारांच्या पारड्यात आपली मते टाकली आहेत. विजयाच्या गणितात भाजपने बाजी मारली असून, त्यांच्या विजयी उमेदवारांना एकूण 11,79,273 मते मिळाली आहेत. ही मते एकूण विजयी उमेदवारांना मिळालेल्या मतांच्या 45.22% इतकी आहेत.

महायुतीने ‘मॅजिक फिगर’ गाठला

भाजप आणि एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेने ‘महायुती’ म्हणून ही निवडणूक लढवली होती. या दोन्ही पक्षांनी मिळून 114 या बहुमताच्या आकड्याला सहज पार केले आहे. महायुतीने एकत्रितपणे 115 हून अधिक जागा जिंकल्या असून, आता मुंबईचा महापौर महायुतीचाच होणार असल्याचे निश्चित झाले आहे.

विकासाच्या अजेंड्याचा विजय

निवडणूक प्रचारात भाजपने मुंबईतील मेट्रो प्रकल्प, कोस्टल रोड आणि पायाभूत सुविधांच्या कामांवर भर दिला होता. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या विकासाच्या दृष्टीला मुंबईकरांनी कौल दिल्याचे या निकालातून सिद्ध झाले आहे. विशेष म्हणजे, मुंबईतील मराठी पट्ट्यातही भाजपने अनेक ठिकाणी मुसंडी मारली आहे.

ठाकरे बंधूंची युती अपयशी?

तब्बल 20 वर्षांनंतर उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांनी अप्रत्यक्षपणे एकत्र येत ‘मराठी अस्मिता’ या मुद्द्यावर प्रचार केला होता. उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेने 65 जागा जिंकून आपली ताकद दाखवून दिली आहे. पण त्यांना सत्ता राखण्यात अपयश आलं आहे. मुंबईकरांनी भावनिक आवाहनापेक्षा विकास आणि सुशासनाला अधिक पसंती दिल्याचे आकडेवारीवरून दिसत आह

What’s your Reaction?
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0

मुख्य संपादक : संजय पांडे

Related Articles

Back to top button
Close
Close