अजब गजब

मुलीची डीएनए चाचणी केल्यावर त्याला कळले ती आपली नाही पण काही वर्षांनी मुलीचा जो मित्र होता तो….

Spread the love

         दवाखान्यात मुल अदलाबदलीच्या घटना घडतात. अनेक चित्रपट अशा कथानकावर बनले आहेत. दवाखान्यात अदलाबदली झालेले हे मूल मोठी झाल्यावर त्यांच्या खऱ्या पालकांना भेटतात असे चित्रपटात दाखवल्या जाते.अगदी चित्रपटाला साजेशी स्टोरी व्हिएतनाम येथे उघडकीस आली आहे. ही  कुठल्या चित्रपटाची कथा नसून दोन कुटुंबांच्या जीवनात घडलेली सत्य घटना आहे. 

           येथील एका कुटुंबात मुलगी जन्माला आली. नवरा बायको खुश झाली. पण मुलगी जसजशी मोठी होत गेली तिचे सौंदर्य पाहून त्याला शंका यायला लागली.  त्यामुळे त्याने डीएनए चाचणी करण्याचे ठरवले. त्याची बायको त्याला ती मुलगी आपलीच आहे आणि तिचे बाहेर अफेयर नव्हते हे डोके फोडून सांगत होती.पण त्याचा  तिच्या बोलण्यावर विश्वास बसत नव्हता. आणि एक दिवस त्याने डीएनए चाचणी केली.तेव्हा त्याच्या पायाखालची जमीन सरकली.         

ती मुलगी नेमकी कोणाची?

साऊथ चायना मॉर्निंग पोस्टमध्ये प्रसिद्ध झालेल्या वृत्तानुसार, वडिलांना मुलीच्या सौंदर्याकडे पाहून कायम शंका यायची ही मुलगी खरंच आपलीच आहे ना. मुलगी मोठी होत होती आणि तिचं सौंदर्य वडिलांच्या मनात संशयाच घर करत होतं. त्याचा संशय एवढा वाढला की, त्यांना अखेर सत्य जाणून घेण्यासाठी पत्नीला डीएनए टेस्टची मागणी केली. नवऱ्याचा हे संशय आणि वेडेपणा पाहून तिचा राग अनावर झाला. तिने टेस्ट करण्यास नकार दिला. पण त्याचा संशय दिवसेंदिवस वाढत होता. तो मद्यपान करु लागला अखेर त्यांनी डीएनए टेस्ट केली. त्यानंतर त्यांच्या आयुष्यात भूकंप आला. ती मुलगी खरंच त्याची नव्हती. त्याला बायकोच्या चरित्रावर संशय आला. तिने सगळ्या प्रकारे त्याला समजून सांगितलं की, तिने असं काहीही केलं नाही. तिच्या दुसऱ्या कोणाशी कधीही शारीरिक संबंध आला नाही. पण तो ऐकायला तयार नव्हता.

मग एकेदिवशी ती मुलीला घेऊन घर सोडून निघून गेली. दुसऱ्या शहरात गेली आणि तिथे मुलीसोबत राहू लागली. मुलीला शाळेत घातलं आणि त्यांचं आयुष्य सुरु होतं. मात्र काही दिवसांनी पती पत्नीमध्ये समेट झाला आणि ते घरी परतले. एके दिवशी शाळा बदलत असताना त्या मुलीची नवीन शाळेतल्या एका मुलाशी मैत्री झाली. योगा बघा ज्या मुलाशी तिची मैत्री झाली त्या दोघांचा जन्मही एकाच दिवशी आणि एकाच रुग्णालयातील होता. तिने नवीन मित्राला तिच्या वाढदिवसाच्या पार्टीला बोलावलं. त्या नवीन मित्राचा चेहरा वाढदिवसाच्या मुलीच्या वडिलांशी अगदी जुळत होता. त्यानंतर कुटुंबीयांनी याबाबत चर्चा केली.

त्यानंतर दोन्ही कुटुंबीयांनी चाचणी करण्याचा विचार केला, त्यानंतर डीएनए चाचणी केली असता ती मुलगी त्या कुटुंबाची आणि त्या कुटुंबातील मुलगा या लोकांचा असल्याच समोर आला. रुग्णालयाचा हलगर्जीपणामुळे मुलांची बदला बदल झाली होती. दरम्यान या घटनेनंतर, दोन्ही कुटुंबांमधील संबंध वाढले कारण त्यांना त्यांच्या मुलींनी मोठे झाल्यानंतर कुठे राहायचे हे ठरवायचे आहे. मात्र, दोन्ही कुटुंबांनी कायदेशीर कारवाई केली की नाही हे अद्याप समजू शकलेले नाही. ही घटना व्हिएतनाममधील आहे.

What’s your Reaction?
+1
0
+1
1
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0

मुख्य संपादक : संजय पांडे

Related Articles

Back to top button
Close
Close