२७ वर्षीय दिंव्यांग तरुणीवर मुस्लिम तरुणा कडून बलात्कार

तरुणीच्या आईला पैशे देऊन प्रकरण निपटवण्यास गळ
कुर्ला / नवप्रहार डेस्क
शेजारी राहणाऱ्या दिव्यांग तरुणीच्या कुटुंबीयांशी असलेल्या जवळीकीचा गैरफायदा उचलत एका मुस्लिम तरुणाने या कुटुंबातील २७ वर्षीय दिंव्याग तरुणीवर बलात्कार केल्याचा संतापजनक प्रकार घडला आहे. विशेष म्हणजे हा घृणास्पद प्रकार घडल्यानंतर आरोपी पीडित तरुणीच्या आई जवळ पोहचला. आणि तिच्याजवळ ५ हजार घेऊन प्रकरण निपटवा असे बोलू लागला.
कुर्ला पश्चिम येथे संतापजनक घटना समोर आली आहे. मानसिक आणि शारीरिकदृष्ट्या दिव्यांग असलेल्या २७ वर्षीय तरुणीला दुकानात बोलावून वासनांध मुसलमान तरुणाने लैंगिक अत्याचार केल्याची घटना सोमवारी समोर आली आहे.
कुर्ला पोलिसांनी या प्रकरणी लैंगिक अत्याचाराचा गुन्हा दाखल केला असून आरोपीचा कसून शोध घेण्यात येत आहे.
पीडित तरुणी ही मानसिक आणि शारीरिकदृष्ट्या दिव्यांग असून ती कुर्ला पश्चिम येथे आई आणि भावासोबत राहण्यास आहे. घराशेजारीच असलेल्या मेट्रेसच्या दुकानात काम करणारा ३० वर्षीय वासनांध मुसलमान आरोपी याचे पीडितेच्या घरी नियमित येणे-जाणे होते, रविवारी सायंकाळी आरोपीने पीडित मुलीच्या आईला फोन करून मुलीला दुकानात पाठवा तिच्याकडे ‘खिचडा’ पाठवतो असे सांगून पीडितेला दुकानात बोलावून तिच्यावर बळजबरीने लैंगिक अत्याचार केला, याबाबत कुठेही वाच्यता केली तर आईला मारून टाकेल अशी धमकी आरोपीने पीडितेला दिली.
पीडिता घरी रडत आली, व आईने तिला बघितले असता तिचे कपडे रक्ताने माखले होते. आईने तिच्याकडे चौकशी केली असता तिने आईला तिच्यावर झालेल्या प्रसंगाबाबत सांगितले. पीडितेची आई आरोपीला जाब विचारण्यासाठी गेली असता आरोपीने दुकान बंद करून तेथून पळ काढला होता, काही वेळाने आरोपी हा पीडितेच्या घरी आला, व त्याने केलेल्या कृत्याची माफी मागत ५ हजार रुपये घेऊन प्रकरण इथेच मिटवून टाका अशी विनंती पीडितेच्या आईकडे केली. पीडितेच्या आईने त्याला ‘मुझे पैसे नही चाहीए, मै तुझे छोडने वाली नही’ असे बोलून पीडितेच्या आईने भावाला फोन लावताच आरोपीने तेथून पळ काढला, पीडितेच्या आईने भावाला घेऊन कुर्ला पोलीस ठाणे गाठून तक्रार दाखल केली. पोलिसांनी तात्काळ गुन्हा दाखल करून आरोपीचा शोध सुरू केला असून लवकरच आरोपीला अटक करण्यात येईल अशी माहिती पोलिसांनी दिली.