खासदार अशोक नेते यांना मिळाली तेलंगणातील निर्मल जिल्ह्याची जबाबदारी
गडचिरोली, / तिलोत्तमा हाजरा
आगामी तेलंगणा विधानसभेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपच्या तेलंगणा राज्य परिषदेच्या दोनदिवसीय संघटनात्मक बैठकीची शुक्रवार (ता. ६) राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी.नड्डा यांच्या उपस्थितीत सांगता झाली. या बैठकीत खासदार अशोक नेतेसुद्धा सहभागी झाले होते. त्यांच्यावर तेलंगणातील निर्मल जिल्ह्याचे प्रभारी म्हणून जबाबदारी देण्यात आली आहे.
विज्ञान भारती इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी (इंजिनियरिंग)कॉलेज मेंडचल (हैदराबाद) येथे भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी. नड्डा यांच्या हस्ते व राष्ट्रीय संघटन महामंत्री बी.एल. संतोष, तेलगणा प्रदेशाध्यक्ष तथा केंद्रीय मंत्री किसन रेड्डी यांच्या उपस्थितीत दीप प्रज्वलनाने बैठकीचे उद्घाटन झाले. या बैठकीत भारतीय जनता पक्षाचे संघटनात्मक धोरण, भाजपने केलेले कार्य, निवडणूक संमेलन, शक्ती प्रदर्शन, विश्वकर्मा योजना, कार्यकर्ता संमेलन, बुथ विजय अभियान, लाभार्थी समस्यांचे संमेलन, महिला संमेलन, युवकांचे कार्यक्रम, पंतप्रधान मोदींनी केलेल्या कार्याचा गौरव यावर राज्य परिषद सदस्यांना मार्गदर्शन केले.या बैठकीला प्रामुख्याने भारतीय जनता पक्षाचे तेलगणा ओबीसी आयोगाचे अध्यक्ष डॉ. लक्ष्मण, तरुण चुघ, प्रवीण दरेकर, भाजपच्या अनुसूचित जनजाती मोर्चाचे राष्ट्रीय महामंत्री तथा खासदार अशोक नेते,अशोक ऊईके आणि अन्य मंत्री व पदाधिकारी उपस्थित होते.
–