आध्यात्मिक

भक्तावर असाच आशिर्वाद असू द्या रामललाला महाआरती समयी आ. सावरकराची मागनी

Spread the love

अकोला / प्रतिनिधी
हिंदुस्थानाची ओळख रामकृष्ण यांची भूमी म्हणून ओळख असून अयोध्या धाम येथे श्री राम प्रभू च्या जन्मस्थानी भव्य दिव्य मंदिर पंतप्रधान नरेंद्र मोदी , राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सर्व संघ चालक मोहनजी भागवत यांच्या व संतांच्या उपस्थितीमध्ये भक्तांसाठी भव्य मंदिर दर्शनासाठी खुले करण्यात आले त्या मंदिराच्या वर्धापनाच्या पहिल्या वर्षा निमित्य अकोला पूर्व विधानसभा मतदारसंघ व बोरगाव मंजू पंचकोशी नागरिकांच्या वतीने राम ललाची महाआरती विशेष पूजा अर्चना तसेच प्रसाद वितरण कार्यक्रम भाजपा प्रदेश सरचिटणीस आमदार रणधीर सावरकर यांच्या हस्ते करण्यात आले त्याप्रसंगी ते बोलत होते.
महाआरती ही मानवी जीवनात आनंद देणारी भक्ती आणि श्रद्धा विश्वासासोबत एकतेचा मंत्र देणारा देणारी असल्यामुळे भगवंताची स्तुती सामूहिकपणे करून प्रत्येकाच्या जीवनामध्ये आनंदाचा क्षण यावा यासाठी प्रार्थना चा महत्वपूर्ण साधन असून सनातन धर्मामध्ये वैज्ञानिक तसेच धार्मिक व वेगवेगळ्या परंपरा ह्या शास्त्रशुद्ध असल्यामुळे प्रत्येकाने आपल्या परंपरेचा सनातन धर्माचा आपल्या गावाची परंपरा धर्माची परंपरा घराची परंपरा समाजाची परंपरा देशाची परंपरा कायम ठेवून नवरात्री निर्माण मध्ये विज्ञान आणि धर्म यांची सांगड घालून कार्यरत राहण्याची गरज असल्याची आमदार सावरकर यांनी सांगून अयोध्या येथे तीन कोटी नागरिकांनी एका वर्षामध्ये भेट देऊन उच्चांक घातला आहे हा भक्ती आणि श्रद्धा आणि विश्वासाचा आणि हे देश प्रभू राम आणि श्रीकृष्णाची भूमी संत आणि महात्मा आणि समाज सुधारकांची भूमी असून जगाला दिशा देणारी मानवतेचा पाठ संदेश देणारी असल्याचे आपण सर्वांनी गौरव करू आधुनिकतेच्या नावावर इतर धर्माचा आक्रमण व अंगीकार न करता आपल्या संस्कृतीचं जतन करावं असे आमदार सावरकर याप्रसंगी म्हणाले सागर तायडे पंकज वडीवाले गवई यांच्या पुढाकाराने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते विशेष पूजा अर्चना करून समाजातील सर्व घटकांवर प्रभू रामचंद्राची कृपा दृष्टी व सर्वांना निरोगी काया द्यावी अशी प्रार्थना आमदार सावरकर यांनी केली व श्री प्रभू रामचंद्राचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून केंद्र सरकार आणि राज्य शासन कार्यरत असून ट्रिपल इंजिनची सरकार आणण्यासाठी आगामी जिल्हा परिषद पंचायत समिती महानगरपालिका नगरपालिका निवडणुकीमध्ये भाजपा महायुतीच्या पाठीशी उभे राहा अशी विनंती सर्व रामभक्तांना केली
अंबादास उमाळे, देवेंद्र देवर माधव मानकर डॉक्टर शंकरराव वाकोडे राजेश बेले जयंत मसने जय कृष्ण ठोकळ, वसंतराव गावंडे दिगंबर गावंडे अनिल गावंडे, प्रशांत पांडे, रवी गावंडे, एडवोकेट देवाशिष काकड, डॉक्टर राजेश नागमते, अनिल मुरूमकर, वेंकट ढोरे, गणेश सारसे, आधी प्रामुख्याने उपस्थित होते

What’s your Reaction?
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0

मुख्य संपादक : संजय पांडे

Related Articles

Back to top button
Close
Close