हटके

बंगल्यात स्पा सेंटर च्या नावाखाली चालणाऱ्या हायप्रोफाईल सेक्स रॅकेट चा पर्दाफाश 

Spread the love

शिर्डी / नवप्रहार मीडिया 

                        साईनगरी शिर्डी मध्ये स्पा सेंटर च्या नावाखाली एका बंगल्यात चालणाऱ्या सेक्स रॅकेट चा पोलिसांनी पर्दाफाश केला आहे. या प्रकरणाने शहरात खळबळ माजली आहे.

              साईचरणी  नतमस्तक होण्यासाठी अनेक भक्त लांबून शिर्डीला येत असतात. यात धनाढ्य लोकांचा देखील समावेश असतो. या लोकांना महागडी दारू पीण्यापासून ते परस्त्रीगमनाचा छंद असतो. नेमकी हीच गोष्ट हेरून गणेश कानडे याने स्पा सेंटर च्या नावावर वेश्यावसाय सुरू केला होता.

ज्या बंगल्यात हे रॅकेट चालवले जात होते त्यात सात ते आठ रूम असून, विद्युत झगमगाट, महागडे फर्निचर आणि आकर्षक फलकावर वेगवेगळ्या मसाजचे फोटो लावून ग्राहकांना आकर्षित केले जात होते. अनेक दिवसांपासून हे स्पा सेंटर सुरू होते. या स्पा सेंटरचा चालक गणेश कानडे (रा. शिर्डी) हा यापूर्वी अनेकवेळा देह व्यापाऱयाच्या प्रकारात आरोपी आहे. परराज्यासह मुंबई, नाशिक येथील मुलींना आणून गणेश कानडे त्यांच्याकडून स्पाच्या नावाखाली सेक्स रॅकेट चालवत होता.

शिर्डीचे उपअधीक्षक संदिप मिटके यांच्या रडारवर गणेश कानडे होता. कानडे वेगवेगळी सिम कार्ड वापरून ग्राहकांशी संपर्क करून छुप्यारीतीने सेक्स रॅकेट चालवतो, अशी माहिती मिटके यांना मिळाली होती. त्यांनी टीममधील एका कर्मचाऱयाला बनावट ग्राहक बनवून स्पा सेंटरमध्ये पाठविले. त्यावेळी येथे दोन परप्रांतीय मुली, मॅनेजर असे तीनजण मिळून आले, तर मुख्य आरोपी गणेश कानडे फरार झाला.

यापूर्वी शिर्डीतील काही हॉटेलवर छुप्या मार्गाने सेक्स रॅकेट सुरू असल्याचा पर्दाफाश उपअधीक्षक संदिप मिटके यांनी केला होता. तसेच हॉटेलमालकांना आरोपी करून दणका दाखवून दिला. शिर्डीत कोणत्याही अवैध व्यावसायिकांची गय केली जाणार नाही. त्यासाठी नागरिकांनी निर्भीडपणे माहिती द्यावी, पोलीस तत्काळ कारवाई करतील, असे आवाहन मिटके यांनी नागरिकांना आवाहन केले आहे.

What’s your Reaction?
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0

मुख्य संपादक : संजय पांडे

Related Articles

Back to top button
Close
Close