मंगरुळ दस्त. व पेठ रघुनाथपुर या जुळ्या गावातील युवकांनी साजरी केली संयुक्त शिवजयंती.
धामणगाव रेल्वे: -/ प्रतिनिधी
अभिमानाचा, गौरवाचा, उत्सव म्हणून रयतेचे राजे श्री.छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती रविवारी मंगरुळ दस्तगीर येथे साजरी करण्यात आली. शिवप्रेमीस नव्हे तर शिवरायांच्या स्वराज्यातील मराठी माणूस म्हणून प्रत्येकाने हा सण साजरा केल्याचे चित्र मंगरुळ दस्तगीर येथे पाहायला मिळाले. “प्रौढ प्रताप पुरंदर, क्षत्रिय कुलावतंस, सिंहासनाधीश्वर, महाराजाधिराज, श्रीमंत श्री छत्रपती शिवाजी महाराज की जय” ह्या घोषणांनी चौक-चौक युवकांनी दणाणून सोडला होता. सोबतच फटाक्यांची आतीषबाजी करून शिवप्रेमींनी छत्रपतींना शिववंदना दिली.
शिवजयंती निमित्त मंगरुळ दस्तगीर व पेठ रघुनाथपुर येथील युवकांनी एकत्रित येत दोन्ही गावामधून संयुक्त भव्य मिरवणूक काढण्यात आली. रॅलीची सुरुवात शिव स्मारक, बाजार चौक मंगरुळ दस्तगीर येथुन करण्यात आली. रॅली मंगरुळ दस्तगीर येथील मार्केट लाईन, बुटले चौक, भगतसिंग चौक, विवेकानंद चौक होत पेठ रघुनाथपुर येथील गावातील मुख्य मार्गावरून होत बाळासाहेब ठाकरे चौक, मंगरूळ दस्तगीर येथे समारोप करण्यात आली.
मिरवणुकी मध्ये बँजो पथक, ढोल पथक, महिला भजन पथक, सांस्कृतिक झलक, जिजामाता देखावा, अश्वारूढ छ.शिवाजी महाराज यांच्या वेषभूषा धारक देखावा आदी विषेश आकर्षण या मिरवणुकीत होते. दोन्ही गावातील युवक, आबालवृद्ध, नागरिक, महिला मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. गावातील चौका चौकात बघणाऱ्यांची गर्दी दिसुन येत होती तसेच चौकात रँली करता , पाणी ,शरबत ठेवन्यात आले होते.
रॅलीचा समारोप बाळासाहेब ठाकरे चौक, मंगरुळ दस्तगीर येथे करण्यात आला रँली यशस्वी करण्यात साठी दोन्ही गावातील युवकांनी अथक परिश्रम घेतले.