शाळा बनली डान्स बार ?

शाळा म्हणजे ज्या ठिकाणी मुलांचे भविष्य घडविल्या जाते. आई वडिलां नंतर जर कोणाला मान आहे तर तो आहे गुरुजनाना. पण सध्याच्या काळात तसें शिक्षकही राहिले नाहीत आणि तसें विद्यार्थी देखील.. ज्या शिक्षकांवर शाळेचे पावित्र राखण्याची जबाबदारी असते. त्याच शिक्षकांनी शाळेला डान्सबार बनवल्याची ? धक्कादायक आणि लज्जास्पद बाब समोर आली आहे.
सध्या एक सरकारी शाळेतील व्हिडिओ व्हायरल होत आहे, जिथे विद्यार्थ्यांचे आयुष्य घडते आणि विद्यार्थी अनेक स्वप्न पाहतात त्याच सरकारी शाळेत चक्क अश्लील डान्स करताना काही तरुणी आणि व्यक्ती दिसून येत आहेत. मुख्य म्हणजे एखाद्या चित्रपटात नाचणाऱ्या बाईच्या कोठ्यावर ज्या प्रकारे आसन व्यवस्था असते तशीच व्यवस्था या ठिकाणी करण्यात आली आहे. आणि तमाशात किंवा कोठ्यावर ज्या प्रमाणे नाचणाऱ्या बाई वर पैशे उधळले जातात अगदी त्याच प्रमाणे येथे पैशाची उधळण करतांना देखील दिसून येत आहे. सध्या सर्वत्र या व्हिडिओची जोरदार चर्चा होत असून व्हिडिओ व्हायरल होताच पोलिसांनी या घटनेचा तपास सुरू केलेला आहे.
व्हायरल होत असलेल्या व्हिडिओत तुम्हाला शाळेतील संपूर्ण परिसर दिसून येत आहे. या ठिकाणी अनेक महिला आणि अनेक व्यक्ती दिसून येत आहे. ज्या महिला आहे ज्या एका गाण्यावर अश्लील डान्स करताना दिसून येत आहेत. तर हे व्यक्ती त्यांच्या समोर डान्स करत आहे. मात्र सर्व व्यक्ती आहे जे मद्यधुंद अवस्थेत असलेले दिसत आहेत.
व्हायरल घटना कुठली?
संपूर्ण व्हायरल होत असलेला व्हिडिओहा बिहार राज्यातील एका सरकारी प्राथमिक शाळेतील आहे. मात्र तो २४ सप्टेंबर रोजीचा असल्याचे समजते. व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होताच पोलिसांनी सर्व घटनेचा तपास सुरु केला असल्याचे समजत आहे.
एवढेच नाही तर व्हिडिओ सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर शेअर होताच नेटकऱ्यांनी अनेक संतापजनक प्रतिक्रियाही दिलेल्या आहेत. व्हिडिओ पाहिल्यानंतर एका यूजरने लिहिले आहे की,”शाळा आहे की काय” तर अनेकांनी संपूर्ण घटनेचा तपास करण्याचे आदेश दिलेले आहे” तर अनेकांनी कारवाई करण्याची मागणी”,अशा अनेक प्रतिक्रिया हा व्हिडिओ पाहून आलेल्या आहेत.