सामाजिक

महायुती सरकाचे जनहितासाठी मोठे पाऊल….

Spread the love

 

लाडकी बहिण योजनेत नियम व अटींमध्ये बदल करण्याच्या मागणीची शासनाने दखल घेतल्याबद्दल आमदार रणधीर सावरकर यांनी मानले आभार

नव प्रहार /  अनिल डाहेलकर

आपण केलेल्या मागणीची दखल सरकारने व महायुती सरकारने व राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेऊन मातृ शक्तीचा सन्मान केला व योजनेला मुदत वाढ केली त्याबद्दल कोटी कोटी धन्यवाद जनता जनार्दनांनी व भाजप कार्यकर्ते व बूथ प्रमुख कार्यकर्त्यांनी व महायुतीच्या कार्यकर्त्यांनी योजनेचा लाभ सर्वांनी घ्यावा व सरकारने जमिनीची अट काढून शेतकऱ्याला न्याय दिला तसेच 65 वर्ष ही मर्यादा ठेवून मातृशक्तीचा सन्मान केला याबद्दल शतशत सरकारचे अभिनंदन व आभार

कार्यकर्ते या योजनेचा लाभ मिळवून देण्यासाठी कार्यरत राहतील या विश्वासासह ठिकठिकाणी मदत केंद्र सुरू केले आहे जनतेला गर्दी न करता या योजनेचा लाभ घेण्यासाठी सहकार्य करावे व कर्मचाऱ्यांची कमतरता मर्यादा व अडचणी समजून मनुष्यबळ च्या विचार करून गर्दी न करता या योजनेचा लाभ घ्यावा ही विनंती आपला रणधीर सावरकर भाजपा प्रदेश सरचिटणीस आमदार अकोला पूर्व

महत्वाची सूचना
१. सदर योजनेत अर्ज करण्याची मुदत दि.१ जुलै, २०२४ ते १५ जुलै, २०२४ पर्यंत ठेवण्यात आली होती. या मर्यादेत सुधारणा करण्यात येत असून आता सदर मुदत २ महिने ठेवण्यात येत असून ती दि.३१ ऑगस्ट, २०२४ पर्यंत लाभार्थी महिलांना अर्ज करता येईल. तसेच दि.३१ ऑगस्ट, २०२४ पर्यंत अर्ज करण्यात आलेल्या लाभार्थी महिलांना दि.०१ जुलै, २०२४ पासून दर माह रु.१५००/- आर्थिक लाभ देण्यात येणार आहे.
२. या योजनेच्या पात्रतेमध्ये आधिवास प्रमाणपत्र आवश्यक असल्याचे नमूद करण्यात आले होते. आता लाभार्थी महिलेकडे आधिवास प्रमाणपत्र उपलब्ध नसेल तर त्या ऐवजी १५ वर्षापूर्वीचे १. रेशन कार्ड २. मतदार ओळखपत्र ३. शाळा सोडल्याचे प्रमाणपत्र ४. जन्म दाखला या ४ पैकी कोणतेहे ओळखपत्र/प्रमाणपत्र ग्राहय धरण्यात येणार आहेत.
३. सदर योजनेतून ५ एकर शेतीची अट वगळण्यात आली आहे.
४. सदर योजनेत लाभार्थी महिलांचा वयोगट २१ ते ६० वर्ष वयोगट ऐवजी २१ ते ६५ वर्ष वयोगट करण्यात येत आहे.
५. परराज्यात जन्म झालेल्या महिलांनी महाराष्ट्रातील आधिवास असणाऱ्या पुरुषाबरोबर विवाह केला असेल तर अशा बाबतीत त्यांच्या पतीचे १. जन्म दाखला २. शाळा सोडल्याचे प्रमाणपत्र ३. आधिवास प्रमाणपत्र ग्राहय धरण्यात येईल.
६. रु.२.५ लक्ष उत्पन्न दाखला उपलब्ध नसेल तर ज्या कुटुंबाकडे पिवळे व केशरी रेशनकार्ड उपलब्ध असेल त्यांना उत्पन्नाच्या दाखला प्रमाणपत्रातून सुट देण्यात येत आहे.
७. सदर योजनेत कुटुंबातील एका पात्र अविवाहित महिलेला सुध्दा या योजनेचा लाभ देण्यात येणार आहे

 

धन्यवाद एकनाथजी शिंदे देवेंद्रजी फडणवीस अजित दादा पवार महायुती सरकार महाराष्ट सरकार*आमदार रणधीर सावरकर भाजपा अकोला पूर्व प्रदेश भाजपा सरचिटणीस

What’s your Reaction?
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0

मुख्य संपादक : संजय पांडे

Related Articles

Back to top button
Close
Close