घाटंंजी बसस्थानक येथे साफ-सफाई कर्मच्या-यास शाल श्रीफळ देऊन महाराष्ट्र,व कामगार दिन साजरा
घाटंजी ता प्रतिनिधि- सचिन कर्णेवार
महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ यवतमाळ विभाग अंतर्गत बस स्थानक घाटंजी येथे १ मे महाराष्ट्र दिन व कामगार दिन उत्साहात साजरा करण्यात आला. महाराष्ट्र व कामगार दिनी घाटंजी येथील बस स्थानक वाहतुक नियंत्रक विष्णू किन्नाके यांच्या हस्ते ध्वजारोहन करण्यात आले. कार्यक्रमाचे संचालन पांढरकवडा आगारातील वाहक मंगेश हुड यांनी केले. कामगार दीनाचे निमित्त्याने बसस्थानक स्वच्छता करणारे एस.एस.सुरावार कंपनी चे सफाई कामगार विजय नामदेव मोहिजे व कविता विजय मोहिजे यांचा ही सत्कार पत्रकार संतोष पोटपिल्लेवार,व मान्यवर हस्ते शाल,श्रीफळ,साडी पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला.यावेळी बस वाहक मंगेश हुड यांनी आपले मनोगत व्यक्त करतांना सफाई कामगारामुळेच बसस्थानकातील कचरा व साफसफाई राहून नागरिका चे आरोग्य सुदृढ़ राहते आणि सफाई कामगारांमुळे रोगराई नष्ट होते.सफाई कामगार घराप्रमाणे आपले बसस्थानक स्वच्छ रहावे या साठी झटतात त्यास प्रवासी नागरिकांनी कचरा कुंडीत कचरा टांकते त्यांना सहकार्य करावे असे मत मंगेश हुड यांनी व्यक्त केले. यावेळी वाहतूक नियंत्रक शैलेश बी. पाली मधुकर नगराळे, भिमराव ताकसांडे,दादा टेकाम,राजुभाऊ मंगाम, जयविष्णू मडावी, जोशना भारस्कर सुरेश सिडाम,अतुल पंधरे,के.के.धुर्वे,देविदास पराते, संतोष आत्राम,प्रकाश गेडाम, किशोर उईके,आर.डी. मडावी,अविनाश शिवनकर.वाय. मेश्राम,एम.बि.उईके, चालक व वाहक यांच्यासह प्रवाशी आदीं उपस्थित होते.
००००००००००००००००००