नाभिक एकता मंच नागपूर जिल्हा ग्रामीण कार्यकारिणी व नागपूर शहर कार्यकारणी गठीत
– नागपूर जिल्हा ग्रामीण अध्यक्ष पदी विलास वाटकर तर शहर अध्यक्षपदी प्रशांत चौधरी यांची नियुक्ती –
वाडी / नागेश बोरकर
नाभिक एकता मंच व्दारे शनीवार दिनांक 13/01/ 2024 रोजी नाभिक एकता मंचच्या कार्यालयामध्ये शिवांगी नगर , हुडकेश्वर रोड नागपूर येथे. नागपूर शहर कार्यकारिणी व नागपूर ग्रामीण जिल्हा कार्यकारिणीचे गठन करण्याकरिता नाभिक एकता मंचचे पदाधिकारी व समाज बांधव उपस्थित होते. या सभेचे अध्यक्षस्थानी नाभिक एकता मंचाचे मार्गदर्शक श्री नानाभाऊ कुकटकर होते आणि केंद्रीय कार्यकारिणीचे अध्यक्ष श्री.धनराज वलूकार, उपाध्यक्ष श्री. नरेश लक्षणे, शरद वाटकर, सल्लागार हरिरामजी चोपकर, कर्मचारी मंच अध्यक्ष प्रकाश ससनकर आणि समाज बांधव अधिक संख्येने उपस्थित होते. याप्रसंगी नाभिक एकता मंच शहर कार्यकारिणी अध्यक्षपदी श्री प्रशांत चौधरी तर नागपूर ग्रामीण जिल्हा अध्यक्षपदी श्री. विलास वाटकर यांची निवड करण्यात आली व *नागपूर शहर कार्यकारिणी* – श्री . विक्की साबळे (सचिव), श्री .निलेश अतकर ( कार्याध्यक्ष) , संजय चांदेकर (उपाध्यक्ष) , शिवशंकर गाडगे (उपाध्यक्ष ,ओम दवलेकर (मिडीया प्रमुख ) ,विजय लक्षणे (संघटक) ,विकास लाखे( माहिती वक्ता) ,यादवराव बोरकर (कोषाध्यक्ष ) , लक्ष्मण सराटे (संचलन प्रमुख) ,संतोष वैद्य (संपर्क प्रमुख) ,अशोक इंगळे – (व्यवस्था प्रमूख) ,मनोहर द्वव्यकर (संघटन सचिव), रोहन इंगळे (संघटन सचिव) ,राजु आंबूलकर ( संघटक) आणी *ग्रामीण जिल्हा कार्यकारीणी* – विलासभाऊ वाटकर नागपूर जिल्हा ग्रामीण,श्री . राहूल गणोरकर ( सचिव) ,राहुल कान्होलकर (कार्याध्यक्ष),बाबाराव वाघमारे (प्रचार प्रमुख) ,राजेश मानकर (कोषाध्यक्ष) ,प्रदिप साखरकर (उपाध्यक्ष) , मंगेश भाकरे (उपाध्यक्ष ) , तेजस पारधी (उपाध्यक्ष),सतिश अतकर (उपाध्यक्ष ) ,निलेश अतकर (उपाध्यक्ष ) , संजय फुलबांधे (सहसचिव), कमलेश नागपूरकर (संघटन सचिव),अमर वाईकर (संघटन सचिव )यावेळी राजेंद्र चौधरी , मुरलीधर चन्ने,प्रकाश नक्षणे , संजय मानकर , हरीभाऊ दरेकर , नामदेव निंबूळकर, छोटू सावरकर , हितेश चौधरी , यादव उंबरकर, अनिल तैकर, रितीक चौधरी, रवी जांबूळकर ,शाम . अमृतकर, नरहरी येस्कर यांची प्रामुख्याने उपस्थीती होती . या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन हरीराम चोपकर यांनी तर आभार राजेंद्र चौधरी यांनी मानले .