सामाजिक

रमजान ईदला दिव्यांग परिवाराच्या घरी आमदार बच्चू कडू

Spread the love

प्रतिनिधी मुबीन शेख. शिरजगाव कसबा.

सिरजगाव कसबा.अमरावती जिल्ह्यातील अचलपूर मतदार संघातील विद्यमान आमदार बच्चू कडू यांची सर्वच जाती-धर्मांच्या सामान्य गरीब कुटुंबांना निस्वार्थ रुग्णसेवा आणि राज्यातील दिव्यांग असणाऱ्यांसाठी अविरहित कार्य करणारे आमदार म्हणून सर्वत्र परिचित आहे अचलपूर विधानसभा मतदारसंघातून सलग तीन वेळा अपक्ष आमदार असलेले बच्चू कडू आपल्या विजयासाठी सामान्य गोरगरीब तसेच दिव्यांग जनतेच्या हक्कासाठी केलेली जन आंदोलन विविध शासकीय योजना जनतेच्या दारी उपक्रम राबविल्यामुळे या जनतेने मतदानाच्या स्वरूपाने दिलेल्या आशीर्वादाने सलग तीन वेळा निवडून लोकप्रतिनिधी झालो अशी कृतज्ञता व्यक्त करत असतात
संपूर्ण महाराष्ट्रात आमदार बच्चू कडू यांचे अनोखे विविध स्टाईल आंदोलन रुग्ण सेवा कार्य जनतेच्या आजही स्मरणात आहे नुकतीच आमदार बच्चू कडू यांची दिव्यांग बद्दलची सहानुभूतीचा प्रचिती देण्याचा प्रसंग पुन्हा शिरसगाव कसबा वासियांना पाहायला मिळाले या गावातील सोमवारखेडा परिसरात राहणारे ऐसान खाॅ सत्तार खाॅ यांच्या घरी उपस्थित राहून
आमदार बच्चू कडू यांनी रमजान ईद साजरी केली अत्यंत गरीब परिस्थिती आणि हात मजुरी करून तीन दिव्यांग मुल कुटुंबाचा उदरनिर्वाह चालवणाऱ्या या मुस्लिम समाजाच्या परिवारामध्ये दोन मुले व एक मुलगी जन्मता अंधत्व दिव्यांग असणारे अपत्य आहे तसेच या मुलांची आईं अनिसा परवीन सुद्धा दुर्घ आजाराने अनेक दिवसांपासून ग्रासले असल्याची माहिती शिरजगाव कसबा गावातील प्रहार कार्यकर्त्याकडून मिळाल्यामुळे आमदार बच्चू कडू यांनी यावर्षी रमजान ईद निमित्य या कुटुंबाच्या घरी भेट देण्याचे नियोजन ठरविले परिवारातील दिव्यांग अनस खाॅ वय १०, अनिस खाॅ वय ६ व अलिषा परवीन वय ४ वर्ष या तीन अंध असणाऱ्या दिव्यांग मुलांसोबत बच्चू कडू यांनी कुटुंबाला मदत करत तीनही दिव्यांग मुलांना ईद निमित्त शिर-खुर्मा गोड पदार्थ स्वतःच्या हाताने भरविला शासनाचे सर्वपरी मदत करण्याचे आश्वासन या दिव्यांग कुटुंबाला बच्चू कडू यांच्याकडून देण्यात आले

What’s your Reaction?
+1
1
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0

मुख्य संपादक : संजय पांडे

Related Articles

Back to top button
Close
Close