हटके

तो बायकोची राख सावडायला गेला अन त्याला मिळाली अशी वस्तू की …

Spread the love

लखनऊ / नवप्रहार डेस्क                   

            प्रसूती साठी आलेल्या महिले सोबत काही न काही अघटित घडल्याचा काही घटना आपल्या वाचण्यात येतात. काही वेळा रुग्णाच्या पोटात कैची, कापूस , कापड या गोष्टी राहून जातात. रुग्णाला त्रास झाल्यावर जेव्हा तो पुन्हा डॉक्टर कडे जातो . तेव्हा डॉक्टर तोच असला तर काही न काही कारण सांगून त्यांना पुन्हा ऑपरेशन करायला लावतात. दुसऱ्या डॉक्टर कडे गेला तर तो सत्य परिस्थिती सांगतो. एका व्यक्ती सोबत देखील असाच प्रकार घडला. हा प्रकार त्याच्या लक्षात जेव्हा तो राख सावडायला गेला तेव्हा त्याच्या लक्षात हा प्रकार आला. चला तर पाहू या काय आहे प्रकरण.

 एका प्रेग्नंट महिलेचा मृत्यू झाला. तिच्या मृतदेहावर अंत्यसंस्कार केल्यानंतर तिचा पती चितेची राख उचलायला गेला. तेव्हा त्याच्या हातात अचानक असं काही लागलं की ते पाहून त्याच्यासह सर्वजण हादरले. उत्तर प्रदेशमधील ही घटना आहे.

मेरठच्या राठोरा खुर्द गावातील नवनीत कौर, प्रसूतीसाठी मवाना शहरातील जेके रुग्णालयात तिला दाखल करण्यात आलं होतं. मात्र शस्त्रक्रियेदरम्यान तिचा मृत्यू झाला. त्यानंतर कुटुंबीयांनी तिच्यावर अंत्यसंस्कार केले. तिचा पती चितेची राख गोळा करत होतात. त्यावेळी त्याच्या हातात असं काही आलं की त्याने विचारही केला नव्हता.

व्यक्तीने केली तक्रार

हे पाहिल्यानंतर कुटुंबीयांना धक्काच बसला. कुटुंबीय सीएमओ कार्यालयात गेलं. यानंतर मेरठच्या मुख्य वैद्यकीय अधिकाऱ्यांनी रुग्णालयाचा परवाना निलंबित केला आहे. याशिवाय या प्रकरणाच्या चौकशीसाठी विशेष समितीही स्थापन करण्यात आली आहे.

चितेच्या राखेत काय होतं?

त्या राखेत सर्जिकल ब्लेड होतं. महिलेच्या ऑपरेशनदरम्यान हे ब्लेड डॉक्टरांनी तिच्या पोटातच सोडलं, त्यामुळे तिचा मृत्यू झाला, असा आरोप तिच्या कुटुंबाने केला आहे. डॉक्टरांचा इतका निष्काळजीपणा असेल याचा विचारही केला नव्हता, असं कुटुंबीयांनी सांगितलं. कआता त्याची चौकशी करण्याची मागणी करण्यात आली. या घटनेचा व्हिडीओही सोशल मीडियावर व्हायरल होतो आहे.

प्रेग्नंट महिलेच्या पोटात टॉवेल

2020 साली ही धक्कादायक घटना समोर आली होती. उत्तर प्रदेशच्या सीतापूर जिल्ह्याती शगुफ्ता अंजुम नावाची महिला, 5 जून 2020 रोजी तिला प्रसूती वेदना सुरू झाल्या. तिला रुग्णालयात दाखल करण्यात आलं. तिची प्रकृती गंभीर होती, त्यामुळे डॉक्टरांनी ऑपरेशन करण्याचं ठरवलं. मात्र बाळ झाल्यानंतर 4 महिन्यांनी तिच्या पोटात तीव्र वेदना होऊ लागल्या आणि सातत्याने उलट्याही होत होत्या.

त्यानंतर तिला पुन्हा त्याच रुग्णालयात नेण्यात आलं, जिथं तिची प्रसूती झाली. सीएमएस डॉ. सुषमा कर्णवाल यांनी तिची प्रसूती केली होती. त्यांनी तिची तपासणी करून काही गोळ्या दिला आणि काही दिवसांत आराम मिळेल असं सांगितलं. मात्र त्या औषधांचा काही परिणाम झाला नाही. तिचं अल्ट्रासाऊंट, सिटी स्कॅनही करून पाहिलं मात्र काहीच समजत नव्हतं असं मोहम्मद फैजान म्हणाले.

अखेर त्यांनी आपल्या पत्नीला लखीमपूरमधील रुग्णालयात नेलं. तिथं डॉ. जेड खान यांना दाखवलं. त्यांनी तिचं एमआरआय केलं. त्यावेळी तिच्या पोटात एक वस्तू असल्याचं समजलं आणि डॉक्टरांनी पुन्हा ऑपरेशन करावं लागेल असं सांगितलं.
ऑपरेशननंतर तिच्या पोटातून टॉवेल निघाला. टॉवेल पोटात राहिल्यानं पोटात संक्रमण पसरलं होतं. तिची एक आतडी खराब झाली होती, जी कापावी लागली. कारण संक्रमणामुळे तिच्या जीवाला धोका होता, असं डॉक्टरांनी सांगितलं. आतडी कापून डॉक्टरांनी तिचा जीव वाचवला.

What’s your Reaction?
+1
0
+1
0
+1
0
+1
1
+1
2
+1
0
+1
0

मुख्य संपादक : संजय पांडे

Related Articles

Back to top button
Close
Close