सामाजिक

महिला आर्थिक विकास महामंडळाने व्यवसायाकरीता दिलेल्या ट्रायसिकली निकृष्ट.ट्रायसिकल दुरुस्ती करून न दिल्यास रास्ता रोको व आमरण उपोषणाचा ईशारा

Spread the love

नेर प्रतिनिधी / नवनाथ दरोई

नेर येथील दिव्यांग एकता व प्रहार दिव्यांग क्रांती संघटनेच्या वतीने जिल्हाधिकाऱ्यांना पाठविण्यासाठी नेर तहसीलचे तहसीलदार शिवाजी मगर यांना निवेदन देण्यात आले.दिलेल्या निवेदनात असे म्हटले आहे की, नेर येथील बंशी लॉन येथे नेर, दारव्हा,दिग्रस मतदार संघाचे आमदार व महाराष्ट्र राज्याचे अन्न व प्रशासन मंत्री तथा यवतमाळ जिल्ह्याचे पालकमंत्री व पाहूण्यांच्या उपस्थीतीत दिव्यांगाना व्यवसायाकरीता ट्रायसिकल व पाच हजार रुपयांचे वाटप करण्यात आले.दिलेल्या ट्रायसिकल निकृष्ट दर्जाच्या निघाल्याने काही दिवसांनी या 27 ट्रायसिकल बदलून देण्यात आल्या.बदलून दिलेल्या ट्रायसिकलही निकृष्ट दर्जाच्या निघाल्यामुळे अनेकांच्या ट्रायसीकल नेर शहरात किंवा परिसरात दुरुस्त केल्या न जात असल्याने दिव्यागांना कमालीचा मनस्ताप सहन करावा लागतो. याबाबत संबंधितांना फोन केला असता तेथील अधिकारी फोन उचलत नाही. अशा परिस्थितीत दिव्यांगांनी व्यवसाय कसा करावा. ट्रायसिकल निकृष्ट दर्जाची निघाली असल्याची तक्रार यवतमाळ येथील महिला आर्थिक विकास महामंडळाना केले असता. संबंधित अधिकाऱ्यांनी उडवाउडविचे उत्तर देत असल्याचे मत दिव्यांग एकता संघटनेचे अध्यक्ष गणेश ठाकरे यांनी केले.महिला विकास मंडळाने आम्हाला दिलेल्या ट्रायसिकल एक तर बदलून द्याव्या नाहीतर दुरुस्ती तरी करून द्याव्या, असे न झाल्यास आम्ही सर्व दिव्यांग नेर तहसील कार्यालयासमोर रास्ता रोको करून आमरण उपोषणाला बसू असा इशारा देण्यात आला. या निवेदनाची प्रत जिल्हा परिषद यवतमाळ चे मुख्याधिकारी,नेर पंचायत समितीचे गटविकास अधिकारी व महिला आर्थिक विकास महामंडळ यवतमाळ यानां पाठविण्यात आल्या.निवेदन देतेवेळी गणेश ठाकरे, गिरीश डोनाडकर, बाळू यावले, अरविंद जाधव, संदीप कोल्हे,दत्ता गव्हाणे, महेंद्र कुकडे, वजाहत ऊल्ला खान,सुफियान खान व अन्य दिव्याग उपस्थित होते.

What’s your Reaction?
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0

Sumit Baniya

Related Articles

Back to top button
Close
Close